Sindhudurg Fort : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची भारतीय पुरातत्त्व विभागाकडून पाहणी

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचनेनुसार पथक गडावर
Sindhudurg Fort
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची भारतीय पुरातत्त्व विभागाकडून पाहणी
Published on
Updated on

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील बुरुजाच्या तळभागातील तटबंदीचा काही भाग ढासळल्याचे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी त्याची तत्काळ दखल घेऊन महसूल प्रशासनामार्फत ASI यांना पत्र लिहून सदर ठिकाणी पाहणी व पुढील अनुषंगिक कार्यवाही करणेबाबत कळविले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण मुंबई मंडळाचे अधीक्षक पुरातत्त्वविद डॉ. अभिजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड उपमंडलचे संरक्षण सहायक संकेत कावलकर, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, देवबाग ग्राममहसूल अधिकारी श्री. वायाळ व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी किल्ल्यावरील ढासळलेल्या बुरुजाच्या भागाची प्रत्यक्ष पाहणी रविवारी सायंकाळी केली.

या पाहणीदरम्यान ढासळलेल्या बुरुजाची सद्यस्थिती, तटबंदीची संरचनात्मक स्थिरता, दगडी बांधकामाची अवस्था तसेच समुद्री लाटा, भरती-ओहोटी आणि पावसामुळे झालेल्या परिणामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आवश्यक तांत्रिक निरीक्षणे व मोजमाप करून संवर्धनासाठी उपयुक्त माहिती संकलित करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news