Sindhudurg ZP Budget | बजेटमध्ये बदल, तरतुदीत वाढ

Sindhudurg ZP Budget | सिंधुदुर्ग जि. प. चे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांसाठी विशेष नियोजन
Sindhudurg Zilla Parishad Elections
Sindhudurg ZP Election(Pudhari File Photo)
Published on
Updated on

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग जि.प. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या स्व-उत्पन्नाच्या सुधारित अंदाजपत्रकात 'एक अध्यक्ष' आणि प्रामुख्याने 'पदाधिकारी' यांच्याशी संबंधित विविध १९ लेखाशीर्षांसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. या सुधारित अंदाजपत्रकात महसूल विभागांतर्गत एकूण १ कोटी ७५ लाख ४ हजार ३०० रुपये इतकी मोठी रक्कम निश्चित करण्यात आली असून, मूळ अंदाजपत्रकाच्या तुलनेत यात ७ लाख ४८ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Sindhudurg Zilla Parishad Elections
NHA Report 2026 | राज्याचा आरोग्य खर्च राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट

या अंदाजपत्रकाचे सविस्तर विश्लेषण केले असता, जि.प.ने लोकप्रतिनिधींचे मानधन, प्रवास भत्ते आणि कार्यालयीन कामकाजाच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिल्याचे दिसून येत आहे. मानधन आणि प्रवास भत्त्यात लक्षणीय वाढ अंदाजपत्रकात सर्वात मोठी आणि लक्षणीय वाढ लोकप्रतिनिधींच्या मानधनात पाहायला मिळत आहे.

अध्यक्ष, सभापती, उपसभापती आणि सदस्यांच्या मानधनासाठी मूळ अंदाजपत्रकात १२ लाख ५७ हजार रुपयांची तरतूद होती, ती सुधारित अंदाजपत्रकात थेट २७ लाख २५ हजार रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच यात १४ लाख ६८ हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच, जि.प. आणि पं.स. सदस्यांच्या प्रवास व दैनंदिन भत्त्यांसाठी मूळ अंदाजपत्रकातील ३५ लाख १५ हजार रुपयांवरून वाढ करून ६० लाख १५ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे सदस्यांच्या एस.टी. प्रवास भत्त्याची ३३ लाख रुपयांची तरतूद कमी करून ती केवळ ३ लाख रुपयांवर आणली आहे.

अध्यक्ष, सभापती उपसभापती यांच्या वैयक्तिक प्रवास भत्त्यासाठी ३ लाख रुपये कायम ठेवण्यात आले आहेत. अध्यक्ष आणि सभापती यांच्या वाहनांसाठी लागणारे इंधन आणि त्यांच्या दुरुस्तीच्या खर्चासाठी ३१ लाख ३० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत, ज्यात मूळ तरतुदीपेक्षा १ लाख ३० हजार रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, नवीन वाहन खरेदीसाठी या आर्थिक वर्षात केवळ १०० रुपये इतकीच नाममात्र तरतूद ठेवण्यात आली आहे, म्हणजेच सध्यातरी नवीन वाहन खरेदीचा कोणताही प्रस्ताव नाही.

कार्यालयीन कामकाज आणि सुविधांवर भर.! जिल्हा परिषदेच्या मुख्य कारभाऱ्यांच्या कार्यालयीन आणि निवासस्थानाच्या व्यवस्थापनासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे. अध्यक्ष व सभापती यांचे कार्यालय तसेच निवासस्थानावरील दूरध्वनी खर्चासाठी ३ लाख ७२ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

Sindhudurg Zilla Parishad Elections
Konkan Railway Monsoon Timetable | कोकण रेल्वेचा वेग मंदावणार !

अध्यक्षांच्या घरभाड्यासाठी ७० हजार रुपये आणि शासकीय पाहुणचारासाठी (आतिथ्य भत्ता) १२ हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे. विविध महत्त्वाच्या बैठका आणि दैनंदिन कार्यालयीन खर्चासाठी (सादिल खर्च) २० लाख रुपये इतकी मोठी रक्कम राखीव ठेवण्यात आली आहे. जि. प. संकुलात अंतर्गत सुविधा पुरवण्यासाठी मूळच्या ५ लाखांवरून वाढ करून १० लाख रुपये निधी देण्यात आला आहे, तर सभागृहातील सुविधा व फर्निचरसाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील पं. स. सभागृहांच्या सुविधांसाठी ५ लाख रुपयांची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. अंदाजपत्रकात लोकप्रतिनिधींच्या ओळखपत्रांपासून ते कर्मचाऱ्यांच्या बौद्धिक विकासापर्यंतच्या गोष्टींची नोंद घेण्यात आली आहे. आमसभेसाठी येणाऱ्या खासदार, आमदारांच्या प्रवास व चहा-फराळाच्या खर्चासाठी १० हजार रुपये निश्चित केले आहेत. जि.प. सदस्यांच्या ओळखपत्रासाठी १० हजार रुपये आणि लेटरपॅडसाठी १० हजार रुपये तरतूद आहे. तर जि.प. सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वाचनालय सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news