Sindhudurg Yellow Alert | सिंधुदुर्गला तीन दिवस ‘यलो अलर्ट’

गडगडाटासह पावसाची शक्यता; समुद्र खवळला, मासेमारी ठप्प
Sindhudurg Yellow Alert
वेंगुर्ले : मच्छीमारानी सतर्कता बाळगून वेंगुर्ले मांडवी खाडीत नांगरून ठेवलेल्या सुरक्षित मच्छीमारी नौका. (Pudhari File Photo)
Published on
Updated on

ओरोस : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 29, 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर या कालावधीसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि.29) गडगडाटी पावसासह विजा चमकण्याची व ताशी 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामानातील या प्रतिकूल बदलांमुळे समुद्र कमालीचा खवळला असून किनार्‍यांवर जोरदार लाटा आदळत आहेत. यामुळे मासेमारी ठप्प झाली असून बंदर विभागानेही मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

Sindhudurg Yellow Alert
Sindhudurg Crime News | ओरोस येथे ५५ लाखांची गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा टेम्पो पकडला

याबाबत सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त सिंधुदुर्ग कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि.30) 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असून वार्‍याच्या वेग 60 किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यांत्रिक तसेच बिगर यांत्रिकी नौकांनी या कालावधीत खाडी अथवा समुद्रात मासेमारीस जाऊ नये. नौका, जाळी, इंजिन आदी मासेमारी साधने सुरक्षित ठेवावीत.

Sindhudurg Yellow Alert
सिंधुदुर्ग : शासकीय रकमेत अफरातफर; ओरोस तलाठी निलंबित

समुद्र खवळल्याने किनार्‍याला बसणार्‍या जोरदार लाटांच्या तडाख्याने किनारपट्टी खचत असून काही ठिकाणी किनार्‍यावर घळ पडत आहेत, यामुळे पर्यटकानीही या कालावधीत समुद्र किनारी न जाण्याचे आवाहन बंदर विभागाने केले आहे.

Sindhudurg Yellow Alert
Sindhudurg : मासे वाहतूक करणार्‍या टेम्पोला आनंदव्हाळ येथे अपघात

मासेमारी नौका किनार्‍यावर

दरम्यान गेले दोन दिवसांपासून समुद्र खवळला असून खबरदारी म्हणून मच्छीमारांनी आपल्या मासेमारी नौका खाडी व समुद्र किनारी सुरक्षीत बांधून ठेवल्या आहेत. विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ले, शिरोडा, निवती आदी सर्वच बंदरांमधून मासेमारी नौका नांगरून ठेवल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news