सिंधुदुर्गात उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का; संजय पडतेंचा जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा

Sindhudurg Politics | शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा दिला राजीनामा
Sindhudurg  Sanjay Padte resignation
संजय पडते यांनी सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला. Pudhari Photo
Published on
Updated on

कुडाळ: पुढारी वृत्तसेवा: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या ठाकरे पक्षात चाललेल्या घडामोडी पाहता सामान्य शिवसैनिकांना न्याय देणं, त्यांची काम करणं अशक्य असल्याने राजीनामा देत असल्याचे पडते यांनी सांगितले. आपली पुढील भूमिका आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेऊ, असे त्यांनी सांगितले.

कुडाळ एमआयडीसी विश्रामगृहावर आज (दि.१८) संजय पडते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी उपविभाग उप विभागप्रमुख सचिन गावडे, काशीराम घाडी, विकास घाडी, किशोर तांबे, भास्कर गावडे, गुरुनाथ गावडे, गुरुनाथ चव्हाण, गणपत चव्हाण आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सद्यस्थितीत सामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम माझ्या हातून होईल अशी परिस्थिती नाही. आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक व निष्ठेने न्याय देण्याचे काम केले. सध्दा पक्षांतर्गत सुरु असलेल्या घडामोडीमुळे काम करणे शक्य वाटत नाही. यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख या पदाचा राजीनामा देत आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून भविष्यात बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत राहीन. आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला ऋणी आहे. असे पडते यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे.

लोकांचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी सत्तेच्या प्रवाहात राहणे गरजेचे आहे. त्यामुळे या पुढे कुठे जायचे हा निर्णय आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा झाल्यांनतर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेणार आहे. आपण बाळासाहेबांचा शिवसैनिक असून भविष्यात बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत राहीन.असे श्री. पडते यांनी सांगितले.

Sindhudurg  Sanjay Padte resignation
सिंधुदुर्ग : कुडाळ नगरपंचायतीत सत्ताधाऱ्यांचाच सभात्याग !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news