सिंधुदुर्ग : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस दलातील तिघांचे निलंबन

देवगड एसटी स्टॅड परिसरातील घटना
Sindhudurg Molestation case
मुलीचा विनयभंग File Photo
Published on
Updated on

देवगड : घरी परतणाऱ्या युवतीची छेडछाड, विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सहा संशयितांपैकी शासकीय सेवेत असणाऱ्या तीन संशयितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या हरिराम मारुती गीते (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), प्रवीण विलास रानडे (३४, मधुबन सिटी, वसई (पू)) या संशयितांवर मिरा भाईंदर- वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) सुहास बावचे यांनी निलंबनाची कारवाई केली. तर याच संशयितांमधील राज्य राखीव पोलीस बल गट ८ मुंबई गोरेगाव येथे पोलीस नाईक म्हणून कार्यरत असणाऱ्या सटवा केशव केंद्रे (३२, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड) या संशयितांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Sindhudurg Molestation case
Pune Crime | पुणे जिल्हा हादरला! जिन्यातून फरफटत नेत ८५ वर्षीय वृद्धेवर बलात्कार

देवगड शहरात पर्यटक म्हणून आलेल्या हरिनाम गीते, माधव सुगराव केंद्रे (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), सटवा केशव केंद्रे, श्याम बालाजी गीते (३५, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), शंकर संभाजी गीते (३३, रा. बदलापूर (पू), जि. ठाणे), प्रवीण विलास रानडे या संशयितांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने देवगड बाजारपेठ मार्गावरील आनंदवाडी नाका येथे एका युवतीची छेड व विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास घडली होती. पीडित युवतीच्या फिर्यादीनंतर सर्व संशयित आरोपींवर देवगड पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४, ७५ (२), १४० (१), १४० (३), १४० (४), ६२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याखाली देवगड न्यायालयाने संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, यातील संशयित हे शासनाच्या विविध खात्यात कार्यरत आहेत. यातील संशयित हरिनाम गीते व प्रवीण रानडे हे पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. संशयित माधव केंद्रे हा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) विभागात कार्यरत आहे. संशयित सटवा केंद्रे हा राज्य राखीव पोलीस बल गट ८ मुंबई गोरेगाव येथे पोलीस नाईक पदावर कार्यरत आहे. श्याम गीते हा नांदेड एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहे. संशयित शंकर गीते हा बृहन्मुंबई महानगरपालिकेतंर्गत भायखळा मुंबई येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे.

Sindhudurg Molestation case
ठाणे | भय इथले संपत नाही! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गर्भधारणा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news