ठाणे | भय इथले संपत नाही! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गर्भधारणा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गर्भधारणा: तिघांवर गुन्हा; दोघांना अटक
sexual assault
अल्पवयीन मुलीवर अत्याचारFile Photo
Published on
Updated on

मिरा रोड : काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत इमारत बांधकाम सूरू असलेल्या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने तिघांनी बलात्कार करून मुलीची गर्भधारणा केल्या प्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत एका गृह प्रकल्पाचे बांधकाम सूरू असलेल्या ठिकाणी व गोल्डन नेस्ट येथील एका बांधकाम सूरू असलेल्या ठिकाणी पीडिता व तिचे नातेवाईक काम करत होते. या ठिकाणी तिन्ही आरोपी यांनी 14 वर्ष 11 महिन्याची अल्पवयीन पीडितेच्या ओळखीचा फायदा घेत वेगवेगळ्या बांधकाम सूरू असलेल्या ठिकाणी पिडीतेवर आरोपी धिरज पासवान याने जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले होते. त्यावेळी आरोपी पासवान याने ही बाब कोणास सांगू नको अशी धमकी दिली होती. त्यात पीडिता ही दोन महिन्याची गरोदर होण्यास कारणीभुत झाला म्हणून आरोपी धीरज पासवान याला अटक करून जेल कोठडी सुनावली आहे. तर दुसरा आरोपी किसन दुबे याला 29 ऑगस्ट रोजी अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले असता 3 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडितेला रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

अद्यापपर्यंत एक आरोपी फरार असून त्याचा तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश मनोरे हे करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news