सिंधुदुर्ग : माणगावमधील ब्रिटिश कालीन आंबेरी पुलाला भगदाड

सह्याद्री पट्ट्यात धुवाधार पाऊस
Sindhudurg News
सह्याद्री पट्ट्यात धुवाधार पाऊस Pudhari Photo

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यात रविवारी (दि.६) सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे कर्ली नदीला पूर आल्याने या पुरात माणगांव शिवापूर मार्गावरील ब्रिटिश कालिन आंबेरी पुलाला मोठं भगदाड पडलं आहे. परिणामी आंबेरी पलिकडील २७  गावांकडे जाणाऱ्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलानजिक सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन पुल बांधले आहे, पण त्या पुलाच्या एप्रोज रोडचे काम अपूर्ण असल्याने त्या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक आहे.Sindhudurg News

सह्याद्री पट्ट्यात धुवाधार पाऊस

माणगाव शिवापूर या मुख्य मार्गावर आंबेरी येथे ब्रिटिशकालीन असलेले आंबेरी पुल धोकादायक बनले होते, तरीसुद्धा पुलावरून वाहनांची ये-जा सुरू होती. रविवारी (दि.८) सकाळपासून माणगाव खोऱ्यातील सह्याद्री पट्ट्यात धुवाधार पाऊस सुरू होता. या पावसात कर्ली नदीला पूर आला. जवळपास १२ तासाहून अधिक वेळ आंबेरी पुल पाण्यात राहिले. यात आंबेरीच्या बाजु कडील पुलाचे पुलाच्या भागाला भगदाड पडले असुन पुलाचा मध्यभाग सुध्दा आणल्याचे दिसत आहे.

परिणामी सध्यस्थितीत हे पुल आता वाहतूकिस धोकादायक बनले आहे. दरम्यान या पुलानजिक  सार्वजनिक बांधकाम विभागाने  नवीन पूल उभारले आहे. मात्र त्या पुलाचा एप्रोज रोडचे काम अद्यापही अपूर्ण आहे, सद्यस्थितीत टू व्हीलर व इतर छोटी खाजगी वाहने त्या पुलावरून ये-जा करतात पण अवजड वाहने त्या पुलावरून जाण्यास धोक्याचे  आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news