ISRO Visit For Students | गुणवंतांना थेट ‘इस्रो’ची सफर!

Sindhuratna Talent Search | सिंधुदुर्गातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हक्काचे व्यासपीठ ठरलेला ‘सिंधुरत्न टॅलेंट सर्च’ परीक्षेचा ज्ञानयज्ञ पुन्हा एकदा आयोजित करण्यात आला आहे.
ISRO Visit For Students
Sindhuratna Talent Search Students(Pudhari File Photo)
Published on
Updated on

कणकवली : सिंधुदुर्गातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हक्काचे व्यासपीठ ठरलेला ‘सिंधुरत्न टॅलेंट सर्च’ परीक्षेचा ज्ञानयज्ञ पुन्हा एकदा आयोजित करण्यात आला आहे. युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने होणार्‍या या परीक्षेचे यंदाचे हे नववे वर्ष असून, जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. विशेष म्हणजे, या परीक्षेतील अव्वल गुणवंतांना थेट बंगळूर येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) भेट देण्याची अनोखी संधी मिळणार आहे.

18 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 26 केंद्रांवर ही परीक्षा एकाच वेळी होणार आहे. इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमातून ही स्पर्धात्मक परीक्षा होईल. प्रत्येक इयत्तेतील पहिल्या 50, अशा एकूण 250 गुणवंत विद्यार्थ्यांना तब्बल अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके, आकर्षक सन्मानचिन्ह, मेडल्स आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. चौथी, सहावी आणि सातवीच्या गटातील प्रत्येकी पहिल्या पाच विद्यार्थ्यांना विमानाने ‘इस्रो’ची सफर घडवली जाईल. दुसरी आणि तिसरीच्या गटातील अव्वल पाच विद्यार्थ्यांना गोवा येथील सायन्स सेंटरला नेण्यात येईल.

ISRO Visit For Students
Kankavali News | कलमठ घरफोडीतील सराईत चोरटा जेरबंद

वाढती लोकप्रियता...

या परीक्षेचा निकाल आणि विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता जपली जाणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा सौ. संजना संदेश सावंत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी परीक्षा प्रमुख सुशांत मर्गज किंवा प्रमोद पवार यांच्याशी संपर्क साधावा.

ISRO Visit For Students
Sindhudurg News | सिंधुदुर्गचे सुपुत्र सुनील नारकर यांची कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती

जिल्ह्यातील प्रमुख परीक्षा केंद्रे

मुख्य केंद्र : विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली.

इतर केंद्रे : फोंडाघाट हायस्कूल, जि. प. शाळा खारेपाटण नं. 1, वामनराव महाडिक विद्यालय-तरेळे, कनेडी हायस्कूल, शिरगाव हायस्कूल, शाळा जामसंडे नं. 1, शाळा कुणकेश्वर नं. 1, पडेल हायस्कूल, रामगड हायस्कूल, आचरा हायस्कूल, टोपीवाला हायस्कूल-मालवण, वराडकर हायस्कूल-कट्टा, कुडाळ हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल-कसाल, वासुदेवानंद सरस्वती विद्यालय-माणगाव, एस.एस.पी.एम. हायस्कूल-सावंतवाडी, सैनिक स्कूल-आंबोली, शाळा माडखोल नं. 1, शाळा मळेवाड नं. 1, सांगेली, मळगाव, खेमराज हायस्कूल-बांदा, न्यू इंग्लिश स्कूल-दोडामार्ग, न्यू इंग्लिश स्कूल-भेडशी, वेंगुर्ले हायस्कूल आणि अर्जुन रावराणे विद्यालय-वैभववाडी.

ISRO Visit For Students
Sindhudurg : ‘तुतारी’चे इंजिन बिघडले, कणकवली स्थानकात प्रवासी 3 तास ताटकळले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news