Sindhudurg News | राज्यात कुडाळ आगार नं. 1 असावे यासाठी प्रयत्न!

आ. नीलेश राणे : आगाराच्या पाच नव्या एसटी बसेसचे लोकार्पण
New ST Buses Sindhudurg
कुडाळ : आ.नीलेश राणे यांच्या हस्ते नवीन बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व एसटी अधिकारी.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

कुडाळ : एसटीचे तसेच कर्मचार्‍यांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. ते सोडविण्यासाठी लवकरच परिवहन मंत्र्यांच्या दालनात एसटीचे प्रमुख अधिकारी आणि महायुतीचे पदाधिकारी यांच्यासमवेत विशेष बैठक आयोजित केली जाईल. सिंधुदुर्गासह राज्यात कुडाळ एसटी आगार एक नंबर असावे यासाठी आपले प्रयत्न रहातील, अशी ग्वाही आ. नीलेश राणे यांनी कुडाळ येथे नव्या एसटी बस लोकार्पण कार्याक्रमात दिली. दरम्यान आ.राणे यांनी कुडाळ बसस्थानक ते पोलिस स्टेशनपर्यंत या बसमधून प्रवास केला. या बसचे सारथ्य चालक रोशन तेंडोलकर यांनी केले.

आ.राणे यांच्या प्रयत्नातून कुडाळ एसटी आगाराला प्राप्त 5 नवीन एसटी गाड्यांचे लोकार्पण शनिवारी येथील बसस्थानकावर आ. राणे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, भाजपचे कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, ओरोस मंडळ तालुकाप्रमुख दीपक नारकर, एसटीचे यंत्र विभाग प्रमुख सुजीत डोंगरे, आगार प्रमुख रोहित नाईक, स्थापत्य अभियंता श्री. केंकरे, वाहतूक निरीक्षक पल्लवी बर्वे, शहरप्रमुख ओंकार तेली, सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे केंद्रीय प्रतिनिधी रोशन तेंडोलकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच एसटी अधिकारी उपस्थित होते.

आ. राणे म्हणाले, या एसटी आगाराला नवीन बसेस मिळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आपण पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी पहिल्या टप्प्यात या पाच बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. महायुती सरकार सर्वसामान्य जनतेसाठी, सर्वसाधारण प्रश्नांसाठी किती जागरूकपणे काम करत आहे, याचे उदाहरण आहे.

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविणार !

आ.राणे म्हणाले, कुडाळ शहराचेही अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्याचे आपले नेहमीच प्रयत्न राहतील. बसस्थानक समोरील मुख्य रस्ता, जिथे एमआयडीसीचा रस्ता संपतो, तिथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत बाराशे मीटर रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आरटीओ अधिकार्‍यांशी बोलून कायमचा दूर केला जाईल. तसेच पोलिस स्टेशन नजीकच्या ट्रॅगल (त्रिकोणी जागेत) मध्ये मालवण रॉक गार्डनच्या धर्तीवर सुशोभिकरण करण्यात येणार आहे. पिंगुळीला जाणार्‍या रस्त्याचेही रुंदीकरण करण्यात येईल. तेथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविला जाईल. 21 व्या शतकातील सुंदर शहर बनविण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे आ.राणे म्हणाले.

आगार प्रमुख रोहित नाईक म्हणाले, आ. राणे यांच्या प्रयत्नांतून कुडाळ आगाराला मंजूर दहा पैकी पाच नवीन बसेस पहिल्या टप्प्यात प्राप्त झाल्या आहेत. अद्ययावत प्रणाली असलेल्या या बसेस आहेत.या बसेसमध्ये एअर सस्पेन्शन, युएसबी चार्जिंग सुविधा, पूश बॅक सीट, बझर यासह अनेक सोईसुविधा आहेत. सूत्रसंचालन सहा. वाहतूक नियंत्रक महादेव आंबेसकर यांनी केले तर आभार दिनेश शिरवलकर यांनी मानले.

New ST Buses Sindhudurg
Sindhudurg : सर्व्हिस रोडवरील बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणे तत्काळ हटवा

आगार प्रमुख रोहित नाईक म्हणाले, आ. राणे यांच्या प्रयत्नांतून कुडाळ आगाराला मंजूर दहा पैकी पाच नवीन बसेस पहिल्या टप्प्यात प्राप्त झाल्या आहेत. अद्ययावत प्रणाली असलेल्या या बसेस आहेत.या बसेसमध्ये एअर सस्पेन्शन, युएसबी चार्जिंग सुविधा, पूश बॅक सीट, बझर यासह अनेक सोईसुविधा आहेत. सूत्रसंचालन सहा. वाहतूक नियंत्रक महादेव आंबेसकर यांनी केले तर आभार दिनेश शिरवलकर यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news