

खारेपाटण : व्यसन म्हणजे जिवंत मरण, त्यामुळे व्यसन सोडा आणि आपले जीवन सुधारा, असा संदेश देत सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहीकर व अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशान्वये खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलिस अंमलदार मिलिंद देसाई यांनी खारेपाटण एस टी बस स्थानक येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबविले.
युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवानिमित आयोजित या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी प्रसिद्धी पत्रके उपस्थित नागरिकांना देण्यात आल्या.
सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये, संतोष पाटणकर, शक्तीकेंद्र प्रमुख सुधीर कुबल, सूर्यकांत भालेकर, माजी सरपंच किशोर माळवदे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शेखर शिंदे, रामा पांचाळ, गणेश कारेकर, सचिन भालेकर यांसह खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी पराग मोहिते, अवधूत गुनिजन, उद्देश कदम आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 ऑगस्ट या कालावधीत अंमली पदार्थाचे धोके व दुष्परिणाम मोहीम राबविण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान घेण्यात येत असल्याचे दूर क्षेत्राचे पोलिस अंमलदार मिलिंद देसाई यांनी सांगितले. या अभियानात आपण सहभाग घेऊन जिल्हा नाशमुक्त करूया, असे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.