Sindhudurg Police | सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताफ्यात २८ वाहने दाखल: पालकमंत्री व गृह राज्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

पोलिस दल अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी मदत : नितेश राणे
28 New Police Vehicles Sindhudurg
Guardian Minister Nitesh RanePudhari
Published on
Updated on

28 New Police Vehicles Sindhudurg

ओरोस : जिल्हा नियोजन निधीतून पोलिसांना २८ अत्याधुनिक वाहने देण्यात आली आहेत. या वाहनांमुळे गुन्हे रोखणे, तपास करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत देणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे. यापुढेही पोलीस दल अधिक मजबूत करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज (दि.१९) येथे सांगितले.

जिल्हा पोलीस दल अधिक सक्षम व आधुनिक बनविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पालकमंत्री नितेश राणे व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते पोलीस दलासाठी २८ अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. सागरी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व्यवस्था अधिक बळकट करणार असल्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

28 New Police Vehicles Sindhudurg
Sindhudurg Police | अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचे विशेष पथक

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे नागरिकांसोबतच पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वाटावे, यासाठी पोलिसांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेचा मजबूत आधार आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक साधने आणि सुविधा देणे ही शासनाची प्राथमिकता आहे.

यावेळी गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हा परीषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपाध्यक्ष दादा साईल, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम तसेच पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news