Sindhudurg News : महाविकास आघाडीचे कुडाळमध्ये धरणे

वांगचुक आणि दीपके यांना पाठिंबा
Sindhudurg News
महाविकास आघाडीचे कुडाळमध्ये धरणे
Published on
Updated on

​कुडाळ : सोनम वांगचुक आगे बढो, अभिजित दीपके आगे बढो- हम तुम्हारे साथ है, मोदी सरकार हाय हाय...अशा गगनभेदी घोषणा देत शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी कुडाळ तहसील परिसर दणाणून सोडला. मॅग्नेस पुरस्कार विजेते सोनम वांगचुक व अभिजित दीपके यांना आंदोलनादरम्यान दिलेल्या वागणुकीच्या तसेच 'नीट', 'जेईई' व 'टीईटी' पेपरफुटी निषेधार्थ हे सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी (एसपी) जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशाची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी केली आहे. अण्णा हजारे हे मुळात आरएसएसचेच कार्यकर्ते होते. तत्कालीन काँग्रेस सरकार उलथवून टाकण्यासाठी भाजप नेत्यांनी अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन घडवून आणले.

मनसे जिल्हाप्रमुख धीरज परब म्हणाले, वांगचुक यांना चादरीमध्ये लपेटून घेऊन जाणे हा लोकशाहीचा अपमान आहे. ​शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी विद्यार्थ्यांचे वाटोळे करणाऱ्या केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

​या आंदोलनानंतर शिष्टमंडळाने कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन दिले. उबाठा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, नगरसेवक मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, कृष्णा धुरी, संतोष शिरसाट, शिवाजी घोगळे, विजय प्रभू, बबन बोबाटे, बाळ कनयाळकर, संतोष मुंज, नजिर शेख, कुणाल किनळेकर, प्रथमेश धुरी, सा. बा. पाटकर, जगन्नाथ गावडे, उदय नलावडे यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्थित होते. सकाळी ११ वा. तहसीलदार कचेरीच्‍या आवारात विरोधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते जमा झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news