Cyber ​​Fraud : राष्ट्रीयकृत बँकेच्या नावे आलेली फाईल डाऊनलोड करताच खात्यामधील पैसे गायब

कुडाळ तालुक्यातील युवकाला 65 हजारांचा ऑनलाईन गंडा
bank scam
राष्ट्रीयकृत बँकेच्या नावे आलेली फाईल डाऊनलोड करताच खात्यामधील पैसे गायब (File Photo)
Published on
Updated on

कुडाळ : मित्राने व्हॉट्सअपद्वारे पाठवलेला एका राष्ट्रीयकृत बँकेची एपीके फाईल डाउनलोड केल्यावर एका युवकाचे 65 हजार 889 रू.एवढी रक्कम त्याच्या बचत खात्यातून गायब झाली. या प्रकरणी संबंधित युवकाने कुडाळ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. नुसार अज्ञाता विरोधात कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 ऑक्टोबर रोजी घडली. संबंधित युवकांनी दिलेल्या ऑनलाईन तक्रारीनुसार प्राथमिक तपास करून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

bank scam
Sindhudurg News : कणकवलीत भाजप व शहर आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज वैध

संबंधित युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार 17 ऑक्टोबर 2025 त्याच्या मित्राने व्हॉट्सअपद्वारे त्याला एका राष्ट्रीयकृत बँकेची एपीके फाईल पाठवली होती. ती डाऊनलोड करताच दुपारी 3 ते 6 वा. या तीन तासाच्या मुदतीत अज्ञाताने सहा बँक ट्रांजेक्शनद्वारे 65 हजार 889 रू. एवढी रक्कम त्याच्या बचत खात्यातून काढून घेण्यात आली. त्याच्या मित्राने त्याला ‌‘बँक ऑफ इंडिया‌’चा लोगो असलेली फाईल पाठवली होती. या बँकेच्या लोगोवर ‌‘बँक ऑफ इंडिया रिवार्ड‌’ असे नमूद केले होते. ही फाईल या युवकाने लागलीच आपल्या मोबाईलला डाऊनलोड केली. फाईल डाऊनलोड होताच त्याला मोबाईल नंबर नमूद करण्यास सूचित करण्यात आले. यानंतर तिथे दिसलेला ऑटो कॅप्चाही नोंदण्यास सांगण्यात आले. युवकाने ही प्रक्रिया पूर्ण करताच पहिल्यांदा 25 हजार, दुसऱ्या वेळी 25 हजार तिसऱ्या वेळी 5 हजार, चौथ्या वेळी 5 हजार, पाचव्या वेळी 3 हजार 67 रुपये, व सहाव्या वेळी 2 हजार 821 रुपये असे एकूण 65 हजार 889 रू. एवढी रक्कम त्याच्या खात्यातून विथड्रॉ झाली.

bank scam
Local Body Election Sindhudurg | जिल्ह्यात युती, आघाडीचे घटक पक्ष स्वतंत्र लढणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news