सिंधुदुर्ग : मंत्री केसरकरांनी सावंतवाडीकरांना प्रत्यक्ष भेटून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

सिंधुदुर्ग : मंत्री केसरकरांनी सावंतवाडीकरांना प्रत्यक्ष भेटून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
Published on
Updated on

सावंतवाडी; पुढारी वुत्तसेवा : कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी काही काळ सुरक्षा बाजुला ठेऊन दिवाळी सणात लक्ष्मी पूजनानंतर सावंतवाडी शहरातील नागरिक, व्यापारी, उद्योजक यांच्याशी संवाद साधला आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

रविवारी मंत्री केसरकर यांनी श्रीधर अपार्टमेंट निवासस्थानी विधीवत लक्ष्मी पूजन व चोपडी पूजन झाल्यानंतर रात्री पावणेआठ वाजता सावंतवाडी बाजार पेठेत प्रत्येक दुकानात जाऊन नागरीकांबरोबर संवाद साधला. सर्वांशी हस्तांदोलन करत त्यांची आपुलकीने चौकशी केली व शुभेच्छा दिल्या. दुकानात, पेढीवर येणाऱ्या मंत्र्याचे सर्वजण स्वागत करत होते. इंदिरा गांधी व्यापारी संकुल, भाजी मार्केट, फुल मार्केट, जय प्रकाश चौक, म. गांधी चौक, असे पायी जात केसरकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. रात्री साडेनऊ वाजता ते निवासस्थानी परतले.

यावेळी बोलताना केसरकर म्हणाले की, 'दरवर्षी व्यापारी बंधूंना भेटल्याने मला नवी ऊर्जा मिळते. हा माझा दरवर्षीचा उपक्रम आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याचा योग या दिवशी जुळून येतो. धावपळीच्या कामाच्या व्यापात आपणास आपल्या विधानसभा मतदारसंघातील जनतेशी भेटता येत नाही. मात्र यानिमित्ताने भेटल्याने आनंद झाला.'

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news