Sindhudurg News : एकाच छताखाली शासकीय योजना अन् दाखले

कुडाळ तहसीलदारांनी केले मुळदे ग्रामपंचायतीचे कौतुक!
Sindhudurg News
मुळदे : महाराजस्व अभियानात तहसीलदार सचिन पाटील यांचा सत्कार करताना संध्या मुळदेकर. सोबत अन्य. (छाया : काशिराम गायकवाड)
Published on: 
Updated on: 

कुडाळ : शासकीय योजनांची माहिती व आवश्यक सर्व दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा मुळदे ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत महाराजस्व अभियान कार्यक्रमात केले. एकूण ४९ लाभार्थी यांनी लाभ घेतला.

ग्रामपंचायत मुळदे व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती मुळदे यांच्या विद्यमाने आणि तहसीलदार कार्यालय कुडाळ यांच्या सहकार्याने सोमवारी ग्रामपंचायत कार्यालय मुळदे येथे विविध शासकीय योजना व त्यासाठी आवश्यक दाखले याचा लाभ मिळण्या करिता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्‌घाटन तहसीलदार सचिन पाटील यांच्या हस्ते झाले. मंडल अधिकारी प्रशांत मसुरकर, सरपंच संध्या मुळदेकर, उपसरपंच प्रवीण पालव, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष संजय पालव, ग्राममहसूल अधिकारी (आंबडपाल) विद्या अरदकर, पोलीस पाटील  रामदास चव्हाण, ग्रा. पं.. सदस्य अपूर्वा पालव, वैशाली पालव, ग्रामपंचायत अधिकारी गोविंद तोरसकर, भिवा पालव, सीआरपी मंगल म्हापणकर,शरद पाताडे ,गणपत चव्हाण, सिताराम पालव, पांडुरंग पालव, लीना जाधव, अर्चना सामंत, साक्षी मेस्त्री, अनुजा आसोलकर कर्मचारी प्रणित पालव ,साक्षी पालव व ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, मुळदे ग्रामपंचायत दरवर्षी महाराजस्व अभियान राबविते. एका छताखाली गावातील सर्व आवश्यक शासकीय योजना तसेच आवश्यक असणारे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी राबवित असणारे हे अभियान निश्चितच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच जणांना तहसीलदार कार्यालयात येणे शक्य नसल्यामुळे गाव पातळीवर असा उपक्रम राबवल्यामुळे सर्वांना हा अतिशय जलद गतीने दाखले उपलब्ध होण्यासाठी स्तुत्य उपक्रम आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत माध्यमातून जे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी निश्चितच सर्व टीमचे कौतुक करावे असेच म्हणावे लागेल. येथील शेतकरी वर्गाने शासनाच्या विविध योजना बरोबरच शेती क्षेत्राशी निगडित जे लाभ आहेत त्याचीसुद्धा माहिती घ्यावी.

या शिबिरात जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, वय अधिवास राष्ट्रीयत्व दाखला शिधापत्रिकेमधे नाव वाढवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, नवीन शिधापत्रिकासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शिधा पत्रिकेतील नाव कमी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे भूमीहिन शेतमजूर , इ डब्ल्यू एस दाखला, वारस दाखला, संजय गांधी योजनेकामी आवश्यक कागदपत्रे, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रहिवासी दाखला, ३० टक्के महिला मराठा समाज नॉन क्रिमिलियर दाखला, नॉन क्रिमिलियर दाखला, शेतकरी दाखला, डोंगरी दाखला, प्रकल्पग्रस्त दाखला, अल्पभूधारक दाखला, आदी दाखल्यांचे कामकाज करण्यात आले एकूण ४९ लाभार्थी यांनी लाभ घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.