Sindhudurg News : कुडाळ बसस्थानकात १० लाखांचे दागिने लंपास

बसस्थानक परिसरात खळबळ
Gold theft |
कुडाळ बसस्थानकात १० लाखांचे दागिने लंपास(Pudhari File Photo)
Published on
Updated on

कुडाळ : मुंबईहून धार्मिक कार्यक्रमासाठी गावी येणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून सुमारे १० लाख रूपये किमतीचे ७ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना कुडाळ बसस्थानक येथे बुधवारी दुपारी २.४५ वा.च्या सुमारास घडली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सुप्रिया सचिन पेडुरकर (३९, रा. मुंबई) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. सुप्रिया पेडुरकर या पतीसह धार्मिक कार्यक्रमासाठी गावी येत होत्या. दुपारी २ वा. हे दाम्पत्य तेजस एक्सप्रेसमधून कुडाळ रेल्वे स्थानकावर उतरले.

यानंतर दोघेही रिक्षाने कुडाळ बसस्थानक येथे आले. पुढे गावी जाण्यासाठी कट्टामार्गे मालवण एसटीमध्ये ते चढले. सीटवर बसल्यानंतर त्यांना पर्सची चैन उघडी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पर्स तपासली असता दागिन्यांचा पाऊच गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर बसमध्ये शोधाशोध करण्यात आली; मात्र चोरटा यापूर्वीच पसार झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पेडुरकर यांनी कुडाळ बसस्थानकात तक्रार नोंदवली.

लक्ष्मी हारासह ७१ ग्रॅम सोन्यावर मारला हात

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सुमारे १२ ग्रॅमचा लक्ष्मी हार, १५ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, ९ ग्रॅमचे कानातील झुमके , ५ ग्रॅमचे कानातले रिंग, २२ ग्रॅमच्या बांगड्या, ५ ग्रॅमची अंगठी, १ ग्रॅमची नथ तसेच २ ग्रॅमचा बटू असा ऐवज आहे. दरम्यान, कुडाळ बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे तसेच परिसरातील बहुतांश कॅमेरे बंद असल्याने तपासात अडथळे येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news