Sindhudurg Fraud News | कोटकामते सहकारी संस्थेतील कथित १.४९ कोटींच्या अपहाराची चौकशी सुरू

माजी विशेष लेखापरीक्षक वसंत कांबळे प्राधिकृत अधिकारी; तत्कालीन संचालक मंडळाला नोटिसा
Fraud Case
Fraud CasePudhari
Published on
Updated on

Kotkamate Cooperative Society
देवगड : देवगड तालुक्यातील कोटकामते ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित येथे कथितरित्या झालेल्या १ कोटी ४९ लाख २४ हजार ३५९ रुपयांच्या अपहारप्रकरणाची चौकशी सुरू झाली असून, या चौकशीसाठी माजी विशेष लेखापरीक्षक (वर्ग-२) वसंत ना. कांबळे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे संबंधित संशयितांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देवगडचे सहाय्यक निबंधक सुनील मरभळ यांनी दिली आहे.

या प्रकरणी तक्रारदार दिनेश लवू राणे तसेच कोटकामते व खुडी येथील ग्रामस्थांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्याकडे मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर न्याय मिळावा, यासाठी ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने उपोषण आणि आंदोलनाचाही इशारा दिला होता. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ८३ अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले.

Fraud Case
Sindhudurg Dodamarg Heavy Rain| दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत

सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून तक्रारदार आणि ग्रामस्थांना पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार, चौकशीसाठी वसंत कांबळे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, चौकशी अहवालातील निष्कर्षांनुसार संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी या कथित अपहारप्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, संस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळाला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. चौकशीदरम्यान उपस्थित झालेल्या विविध मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत.

Fraud Case
Sindhudurg Flood : आंबोली परिसरात मुसळधार पाऊस; हिरण्यकेशी नदीला महापूर

प्राथमिक चौकशीत संस्थेच्या सन २०११-१२ पासूनच्या सुमारे १० ते १२ वर्षांतील थकीत कर्ज व्यवहारांबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच संस्थेच्या इमारत बांधकामासाठी करण्यात आलेल्या ठेवींच्या व्यवहारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, या सर्व बाबींची सखोल पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशी अहवालानंतर या प्रकरणातील जबाबदारांवर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news