

Kankavli Goa illicit liquor seized
सिंधुदुर्ग: जिल्ह्यात अवैध धंद्यावर पोलिसांनी कारवाई करण्याचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने कणकवली तालुक्यात पोलीस निरीक्षक नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली कासारडे येथे शुक्रवारी सायंकाळी 1 लाख 64 अवैध हजारांची गोवा बनावटीची दारू पकडण्यात आली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे, पांडुरंग पांढरे, चंद्रकांत झोरे, स्वप्निल जाधव यांनी केली.
शनिवारी (दि.३०) सकाळी कणकवली शहरात शिवाजीनगर व कांबळे गल्ली येथे पोलिसांनी अवैध दारू व्यवसायावर धाड टाकली. यावेळी जवळपास दोन लाखांचा गोवा बनावटीचा दारू साठा जप्त करण्यात आला. पुढील तपास कणकवलीचे पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे, पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद सुफल, महिला पोलीस नाईक उज्ज्वला मांजरेकर आदी कर्मचाऱ्यांनी केली. पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर अवैद्य व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस आणि महसूल विभाग ॲक्शन मोडवर आले आहेत.