Ganesh Chaturthi | सिंधुदुर्ग, गोव्यातील युवकांचा दुबईत गणेशोत्सव

उत्सवाचे यंदा बारावे वर्ष
Ganesh Chaturthi
गणेशोत्सवात एकत्र आलेले सिंधुदुर्ग आणि गोव्यातील युवक.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

सावंतवाडी : कामानिमित्त परदेशी राहणार्‍यांना सण, उत्सवासाठी दरवेळी गावी येणे शक्य होत नाही. मात्र आपले सण साजरे करण्याची उर्मी स्वस्थही बसून देत नाही. गणेशोत्सव म्हणजे कोकणी माणसाचा ‘जीव की प्राण’!. मग कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला, तरी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतो. आखाती देश दुबई -शारजाहमध्ये सिंधुदुर्ग व गोवा राज्यातील काही युवक कामानिमित्त राहतात. हे युवक एकत्र येत गणेश चतुर्थी उत्सव साजरा करतात. गेली बारा वर्षे त्यांचा हा गणेशोत्सव साजरा होत आहे. विशेष म्हणजे मुस्लिम परंपरांसाठी कट्टरवादी देश अशी ओळख असलेल्या दुबईसारख्या देशात गणेशोत्सव दरवर्षी साजरा करण्याची या युवकांची ही परंपरा निश्चित वाखण्याजोगी आहे.

शेखर मांजरेकर, नारेश मांजरेकर, देवानंद वालवोईकर, अजित शेठगावकर, सुरेश परब आदी युवक सन 2012 पासून गणेश चतुर्थी साजरी करण्यास सुरुवात केली. पहिले दोन वर्ष ते फक्त गणेशपूजन करायचे. यानंतर जेव्हा आपल्याकडच्या युवकांची संख्या वाढली, तेव्हापासून मोठ्या जल्लोषात मंडप, डेकोरेशन, महाप्रसाद, आरती, भजन अशा विविध कार्यक्रमांनी हा गणेशोत्सव साजरा करण्यास त्यांनी सुरूवात केली. दुबई परिसरात राहणारे अन्य भारतीय व मित्रपरिवारही त्यांच्या या गणेशोत्सवात सहभागी होतात व सहकार्यही करतात.

दुबईमध्ये प्राणप्रतिष्ठापना केलेली श्री गणेश मूर्ती.
दुबईमध्ये प्राणप्रतिष्ठापना केलेली श्री गणेश मूर्ती.
Ganesh Chaturthi
Sindhudurg Railway News | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांच्या समस्या ऐरणीवर; गणेशोत्सवपूर्वी उपाययोजना न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा

गणेश मूर्ती सजावटीपासून मूर्ती पूजन, नैवद्य,भजन, फुगड्या आदी कार्यक्रम मोठ्या थाटामाटात करतात आणि परदेशी राहूनसुद्धा आपली रूढी परंपरा जपताना दिसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news