Illegal transport of 16 bulls in Kankavli : कणकवलीत १६ बैलांच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई, सहा जणांविरुद्ध गुन्हा

Illegal transport of 16 bulls in Kankavli : आयशर टेम्पोसह पायलटिंग करणारी इनोव्हा जप्त; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

कणकवली: देवगडहून कोल्हापूरच्या दिशेने १६ जनावरांची अवैध वाहतूक करणारा आयशर टेम्पो गोरक्षकांनी पोलिसांच्या सहकार्याने तरेळे येथे पकडला. या टेम्पोमध्ये चारापाणी न देता अत्यंत क्रूरपणे आणि दाटीवाटीने बांधलेल्या अवस्थेत १६ बैल आढळून आले.

गोरक्षक आणि पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत जनावरांसह आयशर टेम्पो आणि त्याला पायलटिंग करणारी इनोव्हा कार ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी टेम्पो चालकासह इनोव्हा कारमधील पाच जणांविरुद्ध कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Nilesh Rane : कुडाळ २१ व्या शतकातील शहर बनविण्याचा प्रयत्न!

८ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास तरेळे येथील वामनराव महाडिक महाविद्यालयासमोरील गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत हा प्रकार उघडकीस आला. तरेळे येथील गोरक्षक तेजस भांबुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जनावरांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडून ठेवला आणि तत्काळ कणकवली पोलिसांना याची माहिती दिली.

Crime News
Sindhudurg News : सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा

या टेम्पोच्या पुढे इनोव्हा कार जात असल्याची माहिती गोरक्षकांनी दिल्यानंतर, पोलिसांनी खारेपाटण चेकपोस्टवर नाकाबंदी करून (एमएच १२ एचक्यू ७३७३) क्रमांकाची इनोव्हा ताब्यात घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news