Sindhudurg News : कुडाळ-मालवण मार्गावर मद्य तस्करी उघडकीस

साडेआठ लाखांच्या मुद्देमालासह सावंतवाडीचा तरुण अटकेत
liquor smuggling
liquor smuggling(File Photo)
Published on
Updated on

कुडाळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाने कुडाळ-मालवण मार्गावर धामापूर येथे कारवाई करत दारूबंदी गुन्ह्यांतर्गत कारसह 8 लाख 41 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.

24 मार्च रोजी दुय्यम निरीक्षक श्रीमती ए. ए. वंजारी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने दोन पंच व स्टाफसह कुडाळ-मालवण मार्गावरील धामापूर येथे सापळा रचला. यावेळी आलेली एक स्वीफ्ट कार थांबवून तपासणी केली असता वाहनात बेकायदेशीर मद्य आढळून आले. याप्रकरणी वाहनासह दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संशयित सुदिन श्रीराम आगरवाडेकर (23, रा. तळवडे, ता. सावंतवाडी) याला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग कुडाळचे निरीक्षक एम. एस. गरुड यांनी दिली. ही कारवाई अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळचे निरीक्षक एम. एस. गरुड, दुयम निरीक्षक ए. ए. वंजारी यांनी केली. या मोहिमेत दुयम निरीक्षक यू. एस. थोरात, सहायक दुयम निरीक्षक एस. एस. चौधरी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news