Sindhudurg News | ‘आणीबाणी’तील संघर्षयात्रींचा गौरव

Emergency-Era Activists | जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्यावतीने सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
Sindhudurg News
सिंधुदुर्गनगरी : आणिबाणीत कारावास भोगलेल्या कार्यकत्यांचा सत्कार करताना जिल्हाधिकारी अनिल पाटील. सोबत सीईओ रवींद्र खेबुडकर, प्रभाकर सावंत, अति.जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत व सत्कारमूर्ती(Pudhari Photo)
Published on
Updated on

ओरोस : देशात 1975 साली लागू झालेल्या आणीबाणीला बुधवार 25 जून रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आणीबाणीत कारावास भोगलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघर्षयात्रींचा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्यावतीने सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन सभागृहात बुधवारी सकाळी हा कार्यक्रम झाला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अति. जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, आरती देसाई, शारदा पोवार, संघर्षयात्री गजानन पणशीकर, नवनगर विकास प्राधिकरणाचे सदस्य प्रभाकर सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, मुख्यालय पत्रकार संघ अध्यक्ष लवू म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.

Sindhudurg News
ओरोस येथील बेकायदेशीर इमारतीवर हातोडा; महामार्ग प्राधिकरणाची कारवाई

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र, गुलाबपुष्प देवून कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाची पाहणी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्यासह मान्यवरांनी केली.

Sindhudurg News
Sindhudurg Election News | तीन वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल!

जिल्हाधिकारी म्हणाले, देशात 1975 साली लागू झालेल्या आणीबाणीला बुधवार 25 जून रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. 1975 ते 1977 या दरम्यान लागू आणीबाणी काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मूल्यांच्या जपवणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीत अनेक जणांनी योगदान दिलं. या लढ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. आणीबाणीच्या या लढ्यात संघर्षयात्रींनी सामाजिक आणि राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेला होता, त्यांचे हे कार्य सदैव स्मरणात राहिल.

गजानन पणशीकर व प्रभाकर सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले. शासनस्तरावर त्यांच्या संघर्षांची दखल घेवून सन्मान केल्याबाबत श्री. पणशीकर यांनी राज्य शासनाचे आभार मानले. सुत्रसंचालन नीलेश पवार यांनी केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी मानले.

आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन

यावेळी केंद्र शासनामार्फत आणीबाणीवर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. याठिकाणी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून देशात सन 1975 ते 1977 मध्ये लावलेल्या आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले. हे प्रदर्शन 27 जून पर्यंत नागरीकांना बघण्यासाठी उपलब्ध असणार आहे. या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी केले आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील रवी देवरे, सचिन वाघ, अमित राणे, शंकर आडेलकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी मोलाचे सहकार्य केले.

सन्मान प्राप्त संर्घषयात्री!

अनिल कालिदास मोंडकर, अरुण नारायण सिध्दये, विजयकुमार (विजय) भिकाजी मराठे, उदय देवेंद्रनाथ जोशी, प्रकाश अनंत सबनीस, विजय राजाराम जगताप, सुंदर शिवाजी जगताप, सुभाष वसंतराव साटम, प्रदिप लक्ष्मण गोळवणकर, गजानन शंकर पणशीकर, बाबुराव सदाशिव भुजबळ, कृष्णा सदाशिव शिरोडकर, श्रीकांत वामनराव भोसले, श्रीम.मालती श्रीधर काळे, प्रभाकर दिनकर मराठे, ध्रुवकुमार शिवहरी रानडे, अजय जयराम जोशी, दत्ताराम बाळकृष्ण शेटकर, मकरंद मधुकर नानल, सावळाराम राजाराम सावंत, नारायण जगन्नाथ वझे, श्रीकृष्ण गोविंद शिरसाट, किशोर पुरुषोत्तम नाईक, रमाकांत विठ्ठल नाईक, सुहास केशव रानडे, अरुण श्रीराम गोगटे, शशिकांत जनार्दन कुलकर्णी, वासुदेव बाबुराव मालवणकर, विश्वास मारुती जोशी, अजित मधुकर तिरोडकर, अशोक पुंडलिक प्रभू, कै. गुरुनाथ शांताराम शिरसाट वारस पत्नी विजया गुरुनाथ शिरसाट, कै.भास्कर योगेश नाडकर्णी वारस पत्नी राधाबाई भास्कर नाडकर्णी, कै. श्रीपाद नृहसिंह काणेकर वारस पत्नी आशालता श्रीपाद काणेकर,कै. विजय वासुदेव रुमडे वारस पत्नी विजया विजय रुमडे, कै. विठ्ठल सखाराम सावंत वारस पत्नी रुक्मिणी विठ्ठल सावंत,कै. नारायण विष्णू गोडसे वारस पत्नी मंदाकिनी नारायण गोडसे, कै. प्रकाश महादेव जाचक वारस पत्नी शीतल प्रकाश जाचक, कै. धनंजय भिकाजी मराठे वारस पत्नी धनश्री धनंजय मराठे,कै.चंद्रकांत रघुनाथ खडपकर वारस पत्नी सुरेखा चंद्रकांत खडपकर, कै. श्रीराम विनायक झारापकर वारस पत्नी नंदिनी श्रीराम झारापकर,कै. विजय सिताराम बोंडाळे वारस पत्नी विनया विजय बोंडाळे, कै.वसंत शंकर मुणगेकर वारस पत्नी वैशाली वसंत मुणगेकर,कै.वसंत जगजीवन झांटये वारस पत्नी वर्षा वसंत झांटये.

Sindhudurg News
Sindhudurg Election News | तीन वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news