Sindhudurg heavy rain
वादळी पावसाचा तडाखा

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

तिलारी दशक्रोशीत मोठे नुकसान
Published on

दोडामार्ग ः दोडामार्ग तालुक्यात परतीच्या पावसाने मंगळवारी अक्षरशः हाहाकार उडवला. सोसाट्याच्या वार्‍यासह झालेल्या पावसामुळे पाळये, सोनावल, तेरवण-मेढे येथे अनेक झाडे मोडून पडली. विद्युतखांबांवर झाडे पडल्याने विद्युततारांसह खांबही जमीनदोस्त झाले; परिणामी वीजपुरवठा खंडित झाला. शिवाय, काही ग्रामस्थांच्या घरांचे पत्रे, कौले उडाले; तर काजू कलमे उन्मळून पडली.

Sindhudurg heavy rain
सिंधुदुर्ग : कंटेनर अडकल्याने तिलारी घाटातील वाहतूक ठप्प

तिलारी येथे राज्य मार्गावर मोठी झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली. तर सोनावल गावातील मुख्य रस्त्यावरही झाडे पडली. पावसामुळे विजेचा लपंडावही सुरू होता. तब्बल दोन तास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत होता. पावसाने तालुक्यात दाणादाण उडवून दिली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस कोसळत आहे. तालुक्यात सोमवारही विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाटासह पाऊस कोसळला. मात्र, मंगळवारी पावसाने तालुक्यात दाणादाण उडविली. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पावसाने तुफान बरसण्यास सुरुवात केली.

शहरासह संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस

बरसत होता. तिलारी दशक्रोशीत सोसाट्याचा वारा सुटला होता. या वार्‍याची तीव्रता इतकी भीषण होती की सोनावल, तेरवण-मेढे, पाळये या परिसरातील अनेक मोठी झाडे अक्षरशः मोडून पडली. काही झाडे रस्त्यालगतच्या विद्युत खांबांवर पडल्याने खांब विद्युत तारांसह जमीनदोस्त झाले. या परिसरातील काही घरांवरील पत्रे, कौले वार्‍याने उडून गेले. त्यामुळे घरात पावसाचे पाणी घुसले व सामानांचे नुकसान झाले. काही ठिकाणी शेतकर्‍यांच्या काजू, केळी पिकांचे नुकसान झाले. सोनावल मुख्य रस्त्यावर झाडे पडल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला. या सर्व घटनेची माहिती शिंदे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मायकल लोबो यांना समजताच त्यांनी भेट देत पाहणी केली. ग्रामस्थांनी पुढाकार घेत रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला केली. मायकल लोबो यांनी तालुका आपत्ती व्यवस्थापनाला या घटनेची कल्पना दिली.

दोडामार्ग-वीजघर राज्यमार्गठप्प

या राज्यमार्गावरील तिलारी-शेटवेवाडी येथे एकाच ठिकाणी अनेक मोठी झाडे पडली. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. पाऊस ओसरताच ग्रामस्थ झाडे बाजूला करण्यासाठी एकवटले. बुधवारी सुट्टी असल्याने गोव्याहून चंदगडच्या दिशेने जाणारे अनेकजण यात अडकून राहिल्याने त्यांचे हाल झाले. ग्रामस्थांनी रस्त्यावर पडलेल्या झाडांचा काही भाग बाजूला करून दुचाकी जाण्यापुरता रस्ता मोकळा करून दिल्याने दुचाकी मार्गस्थ झाल्या.

Sindhudurg heavy rain
सिंधुदुर्ग : सैनिकांचे कपडे शिवण्याच्या नावाखाली टेलरला लाखाचा गंडा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news