Devgad Tree Collapse | देवगडमध्ये वादळी वाऱ्याने आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले; वाहतूक ठप्प

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा आर्थिक हानी झाली नाही
Devgad Tree Collapse
Devgad Tree CollapsePudhari
Published on
Updated on

Traffic Blocked Devgad

देवगड : देवगडमध्ये गुरुवारी (दि.७) सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे खालची बाजारपेठकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत उभे असलेले जुने आंब्याचे झाड अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा आर्थिक हानी झाली नाही. मात्र, काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

देवगड एसटी स्थानक ते खालची बाजारपेठ हा परिसरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग मानला जातो. सायंकाळच्या सुमारास अचानक वेगाने वाहू लागलेल्या वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले मोठे आंब्याचे झाड उन्मळून थेट रस्त्यावर कोसळले. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Devgad Tree Collapse
Sindhudurg News : कडक उन्हाळ्यातही सुखावतोय केशरी आल्हाददायक नजारा!

घटनेची माहिती मिळताच देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने झाडाच्या फांद्या आणि खोड कापून रस्त्याच्या बाजूला हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. सुमारे काही वेळाच्या प्रयत्नांनंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, या घटनेनंतर पावसाळ्यापूर्वी धोकादायक व जुनी झाडे तपासून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news