Sindhudurg gambling raid | माणगाव येथे जुगारावर पोलिसांचा छापा; 7 जणांवर गुन्हा

चार दुचाकी व 4900 रुपये रोख रकमेसह दोन लाख 29 हजाराचा मुद्देमाल जप्त
 Gambling
GamblingPudhari
Published on
Updated on

कुडाळ : तालुक्यातील माणगाव कट्टा गाव येथे माडाच्या बागेत अंदर बाहर नावाचा जुगारावर कुडाळ पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एकाला जागीच पकडण्यात आले आहे. उर्वरित सहा जण पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पळून गेले आहेत. यामध्ये 4 हजार 900 रुपये रोख रक्कमेसह चार दुचाकी, दोन लाख 29 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

 Gambling
Nanded Gambling Raid : नांदेडमध्ये दोन जुगार अड्ड्यांवर छापा

कुडाळ पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी माणगाव कट्टा गाव येथील खेळण्याच्या मैदानाच्या लगत असलेल्या एका माडाच्या बागेत अचानकपणे छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी काही जण अंदर बाहेर नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या या कारवाईची चाहूल लागतात काहीजण तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र पोलिसांनी गणपत धोंडी धुरी वय 61 राहणार माणगाव बेनवाडी याला ताब्यात घेण्यात यश मिळवले. यानंतर ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीकडून उर्वरित पळालेल्या संशयितांची नावांची माहिती घेतली. यानुसार त्यांची नावे विशाल विजय लाड (वय 45 रा. माणगाव ढोलकरवाडी) सुनील बाबू भगे (वय 35 रा. माणगाव बाजार), श्रीकांत अर्जुन केरकर (वय: 27 रा. माणगाव तिठा), प्रकाश बाळकृष्ण लाड (वय 38 रा. माणगाव ढोलकरवाडी), राजन शशिकांत मयेकर (वय 50 रा. माणगाव कट्टावाडी), सोमा बाबू सुकी (वय 58 रा. माणगाव तिठा) असल्याचे निष्पन्न झाले.

 Gambling
Nanded crime | किनवटमध्ये तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा

यानुसार या सातही जणांवर अंदर बहर जुगारसाठी पैसे लावून खेळ खेळवित असताना मिळून आल्याप्रकरणी महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 40 हजाराची पॅशन प्रो, 45 हजार रुपये किमतीची बजाज डिस्कव्हर, 95 हजार रुपये किमतीची बजाज फ्रीडम, 45 हजार रुपये किमतीची बजाज डिस्कवर अशा चार दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच घटनास्थळी मिळालेले 4900 रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल कुडाळ पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस नितीन राजेंद्र शेडगे यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news