

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे भागात बेकायदेशीर बंदूक तयार करणे प्रकरणातील आरोपींची संख्या दोन अंकी जाण्याची शक्यता आहे. कुडाळ पोलिसांनी आता तपासाची सूत्रे इतर जिल्ह्यांकडे वळवली असून असून लवकरच अजून एक आरोपी कोल्हापूर जिल्ह्यातून ताब्यात घेण्याची तयारी पोलीसांनी केली असल्याचे समजते. कुडाळ पोलीस ॲक्शन मोडवर आल्यामुळे संशयितांचे धाबे दणाणले आहेत.
माणगाव खोऱ्यातील मोरे येथून अनधिकृत बंदुका बनवण्याचा कारखाना समोर आल्यानंतर कुडाळ पोलीसानी सबंधित सशयित आरोपीना पकडण्यास सुरवात केली आहे. आता पर्यंत शांताराम दत्ताराम पांचाळ ( 41 रा मोरे,), आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी (32 रा माणगांव), यशवंत राजाराम देसाई (58 वाणेगल्ली आजरा), प्रकाश राजाराम गुरव (वय 40 रा. आजरा), सागर लक्ष्मण घाडी(या.मालवण-नांदरुख), या पाच जणांना ताब्यात घेत अटक केली आहे. या पाचही जणांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
यानंतर आता पोलीसाच्या तपासाला गती मिळाली आहे. सिधुदूर्ग जिल्ह्यात अशा प्रकारच्या बंदूक धारकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यामुळे अनधिकृत बंदुका बाळगणाऱ्यांचे धाबे दणालले आहेत. पोलीसानी कसून तपास सुरु केल्याने आता आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही संशयित आरोपीची संख्या दोन आकडी संख्या पार करण्याची शक्यता आहे. तपास अतर्गत आता कोल्हापूर जिल्ह्याकडेही पोलीसानी लक्ष केद्रीत केले आहे. लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील एक आरोपी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. मात्र दिवसभर कुडाळ पोलिसांचे चौकशी सत्र सुरू असून पोलिसांच्या चौकशीच्या यादीत अनेक नावे असून लवकर उर्वरित संशयिताच्या मुसक्या पोलीस आवळण्याची शक्यता आहे.