

वेंगुर्ला : प्रशासनामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी भुभागात बुधवार दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वा. पासून २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत असे 36 तास सागर कवच 2 हे अभियान राबविण्यात येणार आहे.
यावेळी रेड टीम ही आतंकवादी वेशात सागरी किनाऱ्यावर समुद्रमार्गे लँड करण्याचा 36 तासांमध्ये वारंवार प्रयत्न करणार आहेत. त्यांना समुद्रातच ओळखून त्यांना पाच नोटिफिकल मैल च्या बाहेरच पकडायचे आहे. यासाठी सर्व सागर दलाचे सदस्य, ग्रामरक्षक दल, सर्व पोलीस पाटील, समुद्रकिनारी राहणारे सर्व नागरिक यांनी अतिशय अलर्ट राहायचे आहे.
तसेच सर्व मासेमारी करणाऱ्या लोकांना महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत की त्यांनी कोणालाही लिफ्ट द्यायची नाही. रेड टीम आपल्याकडे लिफ्ट मागू शकते. त्यामुळे समुद्रात कोणत्याही व्यक्तीला लिफ्ट द्यायची नाही. अगदी त्यांनी सांगितले की आम्ही सागर कवचे पोलीस कर्मचारी आहोत असे जरी सांगितले तरी त्यांना लिफ्ट द्यायची नाही. काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ वेंगुर्ला पोलीस निरीक्षक वेंगुर्ला निसर्ग ओतारी यांच्याशी किंवा कंट्रोल रूम (फोन नंबर 02362-228616), पोलीस निरीक्षक श्रीमती मुल्ला यांच्याशी संपर्क साधावा.
सर्वांनी सतर्क राहून रेड टीमला पकडून सदर अभियान यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी केले आहे.