Vaikunthbhai Mehta Award | सिंधुदुर्ग बँकेला सन 2023-24 चा कै. वैकुंठभाई मेहता पुरस्कार

उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून पुरस्कार प्रदान
Vaikunthbhai Mehta Award
मुंबई : पुरस्कार स्वीकारताना मनिष दळवी व अतुल काळसेकर. सोबत अन्य संचालक.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

ओरोस : महाराष्ट्र राज्यात अग्रगण्य जिल्हा बँक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंधुदुर्ग बँकेला कोकण विभागातून सन 2023-24 साठीचा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार प्राप्त झाला आहे. यामुळे बँकेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कै. वैकुंठभाई मेहता यांचे सहकार क्षेत्रासाठीचे योगदान महत्त्वपुर्ण असून त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.

राज्याचे गृह निर्माण, शालेय शिक्षण, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व कोकण विभागीय आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा बुधवार 23 जुलै रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे झाला. हा पुरस्कार राज्य सहकारी बँक असो. यांच्या वतीने प्रदान करण्यात आला.

सोहळ्यास सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक गणपत देसाई, रवींद्र मडगांवकर, समीर सावंत, नीता राणे, प्रज्ञा ढवण, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग बँकेने मार्च 2025 अखेर 6 हजार कोटीचा व्यवसाय टप्पा गाठला असुन बँक आता 8 हजार कोटीच्या व्यवसाय उद्दीष्टाकडे वाटचाल सुरु केली आहे. यशाचे हे टप्पे गाठत असतांना बँकेने सामाजिक भान राखत विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. अशा या नामांकीत पुरस्कारांच्या माध्यमातून मिळणारी कौतुकाची थाप ही यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी ऊर्जा देणारी आहे.

बँकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास तसेच सिंधुदुगचे पालकमंत्री तथा बँकेचे संचालक नीतेश राणे व भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी बँक संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे.

Vaikunthbhai Mehta Award
Sindhudurg News | तोंडवळी - तळाशिल किनारपट्टी संरक्षित करण्यासाठी बंधारा घालण्याच्या कामाला सुरूवात

जिल्हा बँकेच्या पारदर्शक कारभारामुळे जिल्हावासिंयांच्या मनात एक विश्वासाचे नाते तयार झाले असून जिल्ह्याच्या विकासामध्ये सिंधुदुर्ग बँकेचा मोलाचा वाटा आहे. बँकेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये बँकेच्या सभासद संस्था, संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांचा वाटा असून याचबरोबर बँकेचे कर्जदार, ठेवीदार, ग्राहक यांचा बँकेवर असलेला अतूट विश्वास यामुळे बँकेची नियमित आर्थिक प्रगती होत आहे.

मनिष दळवी, अध्यक्ष-सिंधुदुर्ग बँक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news