Patient Bank : आंदुर्ले ग्रामपंचायतीने सुरू केली ‌‘पेशंट बँक‌’!

आजारी रुग्णांना मिळणार आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य
Patient Bank
आंदुर्ले ग्रामपंचायतीने सुरू केली ‌‘पेशंट बँक‌’!
Published on
Updated on

कुडाळ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आंदुर्ले ग्रामपंचायतीने गावातील रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी ‌‘पेशंट बँक‌’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे आजारी रुग्णांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना आजारपणाच्या काळात आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागणीनुसार उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.

Patient Bank
Sindhudurg News : दोडामार्गच्या नगरसेवकाकडून तलाठ्याला मारहाण

ज्येष्ठ नागरिक आजारी असल्यास किंवा अन्य रुग्णांना अशा प्रकारच्या साहित्याची आवश्यकता भासल्यास ती ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागामार्फत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची मोठी अडचण दूर होणार असून, ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.

पेशंट बँकमधील उपलब्ध साहित्य ग्रामपंचायत आरोग्य विभागाकडे सुपूर्द करताना सरपंच अक्षय तेंडोलकर, उपसरपंच चंद्रकीसन मोर्ये, माजी सरपंच सौ. आरती पाटील, ग्रामपंचायत अधिकारी कृष्णा पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल भगत, प्रसाद सर्वेकर, अंजनी पाटकर, सौ. स्मिता पिंगुळकर, सौ. सुप्रिया येरम, आरोग्य सेविका सौ. आर. एस. बागकर, सर्व अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. हा उपक्रम ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून, गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळण्याचा मार्ग या ‌‘पेशंट बँक‌’मुळे मोकळा झाला आहे.

Patient Bank
Sindhudurg Crime : सांगुळवाडीतील तरुणाचा घरातच सडलेल्या स्थितीत मृतदेह

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news