

नांदगाव : कणकवली तालुक्यातील तळेरे येथील मुंबई गोवा महामार्गावर दळवी महाविद्यालय समोर दुचाकी व कार याच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार चंद्रकांत फोंडके याना गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मुत्यू झाला. सदर अपघात शनिवारी दुपारी १२:१५ च्या सुमारास घडला.
या अपघाताचे सविस्तर वृत्त असे की, चंद्रकांत कृष्णाजी फोंडके,वय ६५ रा.फोंडाघाट बाजारपेठ हे काही कामानिमित्त तळेरे येथे आले होते. मुंबई गोवा महामार्गावरील तळेरे दळवी महाविद्यालय येथून जात असताना याचवेळी गणपतीपुळे वरून मालवणच्या दिशेने कार घेऊन जाणारे पर्यटक हेमंत रेमाबाशे व मित्र प्रणित गौडणकर, रा.बेळगाव हे आले असता या दोन वाहनात भीषण धडक होत अपघात घडला.
यावेळी या अपघातात फोंडके याना गंभीर दुखापत झाली असताना स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य करत त्याना तळेरे बाजारपेठ याच्या रूग्णवाहीकेने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचे निधन झाले. यावेळेस कणकवली पोलीस उपनिरीक्षक पन्हाळे,मिलिंद देसाई, कॉन्सेटेबल श्रीम.ताबे यानी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. अपघातातील मृत श्री फोंडके हे फोंडाघाट बाजारपेठेतील जुने व्यापारी होते. त्याच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.