

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील परुळे गवाणवाडी येथील रहिवासी प्रशांत गुरुनाथ दाभोलकर (वय वर्ष 30) याचे 3 ऑक्टोबर रोजी रात्री शेळपी रस्त्यावर अपघाती निधन झाले. तो आपल्या दुचाकीवरून जात असताना रात्रीच्या वेळी रस्त्यांचा अंदाज चुकल्यामुळे दुचाकी निसला आदळली. त्यामुळे पडल्याने डोकीवर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
धडक एवढी जबरदस्त होती की रस्त्याचा निस निथळून पडला आणि गाडी रस्त्याखाली पडली. त्याचा या अपघाती मृत्यू मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तो प्रचंड मेहनती असा मुलगा होता. त्यांच्या पश्चात् आई, वडील, बहीण, काका, काकी, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल झाला असून निवती पीएसआय दिलीप शेट्ये हे अधिक तपास करीत आहेत.