

कुडाळ : कुडाळ पोलिसांनी शहरातील अवैध गुटखा विक्रीवर केलेल्या कारवाईतील दुसर्या संशयिताला पकडण्यात यश आले आहे. 22 ऑगस्ट रोजी गुटखा प्रकरणी केलेल्या या कारवाईतील भूषण श्रीकृष्ण शिरसाट (59, रा. बांदा) याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत सुनावली.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कुडाळ पोलिसांनी शहरातील लक्ष्मीवाडी येथील एका स्टोअरवर 22 ऑगस्ट रोजी छापा टाकला होता. यावेळी नीलेश प्रकाश कांबळी (43, रा. कुडाळ लक्ष्मीवाडी) यांच्या स्टोअरमध्ये गुटखा आढळून आला होता. पोलिसांनी हा गुटखा जप्त केला होता.
यामध्ये विमल, चेतना, विमल पान मसाला, आर आर अशा प्रकारच्या विविध गुटखाचा समावेश होता. यातील संशयित नीलेश कांबळी याने आबा शिरसाट (रा. बांदा )याने आणून दिलेला हा गुटखा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या व शरीरास अपायकारक असलेला गुटखा बाळलेल्या स्थितीत मिळून आला.
या प्रकरणी अन्नसुरक्षा मानके कलम 59 व भारतीय न्याय संहिता 123,274, 275,3(5) नुसार निलेश प्रकाश कांबळी (रा. कुडाळ), व भूषण उर्फ आबा श्रीकृष्ण शिरसाट (रा. बांदा ) या दोघांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एका संशयिताला त्याच वेळी अटक करण्यात आली. आता दुसरा संशयित भूषण श्रीकृष्ण शिरसाट याला पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेत अटक केली.