Elephant Scare | दोडामार्गमध्ये 'बाहुबली'चा थरार! मोर्ले मुख्य रस्त्यावर हत्ती अन् ग्रामस्थ आमनेसामने

Elephant Scare | ग्रामस्थ, वाहनचालक, विद्यार्थ्यांची उडाली घाबरगुंडी
Mahadevi Elephant news
Mahadevi Elephant newsPudhari
Published on
Updated on

दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा

बाहुबली टस्कर हत्ती सोमवारी सकाळी मोर्ले मुख्य रस्त्यावर अचानक दिसल्याने परिसरात खळबळ उडाली. रस्त्यावर थेट हत्तीसमोर उभे ठाकल्याने ग्रामस्थ, वाहनचालक आणि शालेय विद्यार्थ्यांची काही काळ अक्षरशः घाबरगुंडी उडाली. मात्र, काही वेळात तो जंगलात निघून गेल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Mahadevi Elephant news
Nashik Water Crisis | नाशिकमध्ये निसर्गाचा विरोधाभास! कुठे अवकाळीचा तडाखा, तर कुठे 98 गावांना पाणीटंचाईचा चटका

मोर्ले परिसरात सध्या पाच हत्तींचा कळप वावरत असल्याची माहिती आहे. मात्र, 'बाहुबली' हा या कळपापासून अलग झालेला असून तो एकटाच मुक्तपणे फिरत आहे. सोमवारी सकाळी अचानक तो मुख्य रस्त्यावर आला आणि काही काळ तिथेच थांबल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली.

Mahadevi Elephant news
Lote Parshuram Protest 2026 | लोटेतील 'पीफास'विरोधात आंदोलकांचा हल्लाबोल

कामानिमित्त बाहेर पडलेले ग्रामस्थ, दुचाकीस्वार आणि विद्यार्थी यांना हा प्रसंग अनपेक्षितपणे समोर आला. काहींनी तातडीने मागे वळण्याचा मार्ग निवडला, तर काहींनी सुरक्षित अंतर राखत थांबणे पसंत केले. या काळात रस्त्यावर वाहतूकही काही प्रमाणात ठप्प झाली होती. 'बाहुबली'चा वावर शांत असला, तरी त्याच्या हालचालींमध्ये अनिश्चितता जाणवत होती. त्यामुळे कोणीही त्याच्याजवळ जाण्याचे धाडस केले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news