Sawantwadi Education News | चौकुळमध्ये शिक्षकाने उभारली 'पुस्तकांची गुढी'

Sawantwadi Education News | वाचन संस्कृती जपण्याचा दिला अनोखा संदेश !
Sawantwadi Education News
Sawantwadi Education News
Published on
Updated on

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा

डिजिटल युगाच्या प्रभावात वाचन संस्कृती लोप पावत असताना सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथील एका ध्येयवेड्या शिक्षकाने सलग तिसऱ्या वर्षी पुस्तकांची गुढी उभारून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

Sawantwadi Education News
Mumbai Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गाचे काम जिवावर उठले! माभळे गावातील घरांना चौपदरीकरणामुळे तडे!

'फूल नको, पुस्तक देऊया', असा संदेश देणारे शिक्षक जावेद तांबोळी यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचे औचित्य साधून चौकुळ नं. ४ मराठीवाडी शाळेचे शिक्षक जावेद तांबोळी यांनी आपल्या घरी पारंपरिक गुढीप्रमाणेच पुस्तके सजवून ही ज्ञानाची गुढी उभारली.

सण-उत्सवांच्या माध्यमातून ज्ञानाचा वारसा पुढे जावा, हा उदात्त हेतू यामागे आहे. सलग तीन वर्ष तांबोळी गुरुजींनी हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवून वाचन चळवळीला बळ दिले आहे. मोबाईलमध्ये व्यग्र असलेल्या तरुण पिढीला पुन्हा पुस्तकांकडे वळवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

Sawantwadi Education News
Goa State Bar Council Election 2026 | गोवा बार कौन्सिल निवडणुकीत मोठा ट्विस्ट! निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती कायदेशीर लढाईनंतर रद्द

यापूर्वीही त्यांनी फूल नको, पुस्तक देऊया ही संकल्पना राबवून कार्यक्रमांमधील अनावश्यक खर्च टाळून ज्ञानाची देवाणघेवाण करण्यावर भर दिला होता. या अनोख्या पुस्तकांच्या गुढीची सध्या परिसरात मोठी चर्चा असून सोशल मीडियावरही या उपक्रमाचे फोटो व्हायरल होत आहेत. एका शिक्षकाने आपल्या कृतीतून समाजाला दिलेला हा संदेश खऱ्या अथनि नवीन वर्षाची ज्ञानमय सुरुवात ठरणार आहे.

वाचन संस्कृती टिकवणे काळाची गरज

पुस्तकांविषयी समाजात गोडी निर्माण व्हावी आणि नवीन पिढीला वाचनाची प्रेरणा मिळावी, हाच या मागचा मुख्य उद्देश आहे. वाचन संस्कृती टिकवणे ही काळाची गरज असल्याचे शिक्षक जावेद तांबोळी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news