Sawantwadi|'टक्केवारी'वरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

Sawantwadi Politics-'टक्केवारी'वरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी
Sawantwadi
सावंतवाडी नगरपरिषदेमध्ये टक्केवारीच्या विषयावर जोरदार झालेल्या खडाजंगीमध्ये माजी नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर व अन्य नगरसेवक यांच्यात शाब्दिक चकमक होताना. (छाया: हरिश्चंद्र पवार)
Published on
Updated on

सावंतवाडी : सावंतवाडी न. प. च्या शुक्रवारी झालेल्या मासिक सभेत टक्केवारीच्या आरोपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विषय सूचीवरील तब्बल १८ विकास कामांच्या मुदतवाढीच्या विषयावरून या वादाला पेव फुटले. दोन टक्क्यांचे विषय सभागृहात मांडण्यापलीकडे शहरात अन्य समस्या नाहीत का? असा वाल करत वेळ पडल्यास याचे पुरावे सभागृहात सादर करू, असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब व शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिला.

यावर सत्ताधाऱ्यांपैकी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर यांनी प्रतिआव्हान दिल्यानंतर विरोधकांनी थेट चार विकास कामांचे पुरावेच सभागृहात सादर केले, ज्यामुळे काही काळ वातावरण तंग बनले होते. अखेर नगराध्यक्षांनी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्याचे आश्वासन देत वादावर पडदा टाकला. नगरपरिषदेची ही मासिक बैठक नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर व नगरसेवक उपस्थित होते.

१८ कामांच्या मुदतवाढीवरून संजू परब आक्रमक

सभेच्या सरुवातीला प्रभाग ८ मधील आरेकर मेस ते शेखर पेडणेकर घराकडे जाणाऱ्या पाणंद रुंदीकरणासाठी कुशल कामगार मिळत नसल्याने कामाला मुदतवाढ देण्याचा विषय मांडण्यात आला. यावरून संजू परब चांगलेच आक्रमक झाले. पाणंदीसारख्या कामाला कुशल कामगार मिळत नाही हे कितपत योग्य आहे? विषय सूचीवर तब्बल १८ कामांना मुदतवाढ देण्याचे विषय आणून प्रशासन ठेकेदारांची शिफारस करत आहे का? आपले प्रशासनाशी साटलोटे आहेत का? असा सवाल केला.

तसेच, टक्केवारीचे विषय सभागृहात घेण्यापेक्षा ठेकेदारांची विशेष सभाच लावा, असा टोला लगावत त्यांनी टक्केवारीचे पुरावे देण्याचा इशारा दिला. सभागृहात परावे सादरः प्रशासनाची कोंडी सभापती सुधीर आडीवरेकर यांनी पुरावे सादर करण्याचे प्रतिआव्हान देताच संजू परब यांनी शहरातील चार विकासकामांचे पुरावे सभागृहात सादर केले. सदर कामे पूर्ण होऊन, बिलापोटी प्रशासनाने काढलेले धनादेश (चेक) महिना उलटला, तरी संबंधित ठेकेदारांना का अदा केले नाहीत? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

सभापती आडीवरेकर यांनी ही कामे अपूर्ण असल्याचा दाखला दिला. मात्र, प्रशासनानेच काम पूर्णत्वाचा दाखला दिला असेल, तर काम अपूर्ण असल्याचा प्रश्नच येत नाही, असे परब यांनी ठणकावून सांगितले. यावर आडीवरेकर यांनी प्रशासनालाच जाब विचारला असता, मुख्याधिकाऱ्यांनी नगर अभियंत्याकडे बोट दाखवले. यावरून सत्ताधारी विरोधकांत शाब्दिक चकमक उडाली. अखेर वाद वाढत असल्याचे पाहून नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले यांनी यात हस्तक्षेप करत, सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करून मार्ग काढला जाईल, असे सांगत विषयाला बगल दिली.

ठेकेदारांना 'ब्लॅकलिस्ट' करण्याची मागणी

कळसुलकर हायस्कूल ते निंबाळकर पिरापर्यंत जाणाऱ्या नाला बंदिस्तीकरणाच्या कामाला मुदतवाढ देण्यावरून देव्या सूर्याजी आणि देवा टेमकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. संबंधित ठेकेदार तकलाद कामे करत असल्याचा आरोप करत, त्याला कायमस्वरूपी 'ब्लॅकलिस्ट' (काळी यादी) मध्ये टाकावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर नगराध्यक्षांनी दोषी आढळल्यास कारवाईचे आश्वासन दिले.

Sawantwadi
सावंतवाडी नगरपरिषदेत 'भाजपा विरुद्ध भाजपा' वाद चव्हाट्यावर, प्रोटोकॉलवरून नगरसेविकांमध्ये जुंपली

नगरपरिषद अग्निशमन केंद्राचे विद्युतीकरण, जिमखाना मैदानातील ड्रेसिंग रूम आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशीय सभागृहाच्या विद्युतीकरणाच्या कामातील दिरंगाईवरून नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी आक्षेप घेतला. जिमखाना ड्रेसिंग रूमचे काम अर्धवट असतानाही ठेकेदाराचे बिल अदा करण्यात आले आहे, त्यामुळे त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी कुडतरकर यांनी केली. यावर, बिल अदा केले असले तरी

नगरपरिषद अग्निशमन केंद्राचे विद्युतीकरण, जिमखाना मैदानातील ड्रेसिंग रूम आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशीय सभागृहाच्या विद्युतीकरणाच्या कामातील दिरंगाईवरून नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी आक्षेप घेतला. जिमखाना ड्रेसिंग रूमचे काम अर्धवट असतानाही ठेकेदाराचे बिल अदा करण्यात आले आहे, त्यामुळे त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी कुडतरकर यांनी केली. यावर, बिल अदा केले असले तरी

Sawantwadi
Weather Forecast- पुढील दोन आठवड्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

ठेकेदाराची डिपॉझिट रक्कम पालिकेकडे शिल्लक आहे. काम योग्य न झाल्यास त्याच्यावर ब्लॅकलिस्टची कारवाई केली जाईल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. सभेमध्ये नळपाणी योजनेच्या विषयावरच अधिक चर्चा झाली. सनातन संस्थेला सभागृह मोफत देण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. दरम्यान, सुरुवातीला पाच हजार रुपये अधिक जीएसटी त्यांच्याकडून घेण्यात यावी, अशी सूचना मांडण्यात आली होती. मात्र, संजू परब यांनी त्यांना या संस्थेचे चांगले काम असून, त्यांना हे सभागृह मोफत देण्यात यावे, अशा प्रकारचा ठराव मांडला. या ठरावाला आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी अनुमोदन

बबन साळगावकरांनीच नळपाणी योजनेची वाट लावली!

टक्केवारीच्या याच मुद्द्यावरून नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. टक्केवारीच्या आरोपांमुळे नगरपालिकेची बदनामी होत असून, हा सभागृहाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनीही ५७ कोर्टीच्या नळ पाणी योजनेवरून मुख्याधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. त्यामुळे मुख्याधिकारी या नात्याने आपण पत्रकार पत्रकाद्वारे याचा खुलासा करावा, अशी मागणी सूर्याजी यांनी केली. यावर सभापती आडीवरेकर यांनी सूर्याजी यांना रोखत, साळगावकर यांनी नळ पाणी योजनेसंदर्भात बोलू नये, त्यांनीच या योजनेची वाट लावली, असा पलटवार केला. साळगावकर हे आपल्याच पक्षाचे आहेत, असे सूर्याजी यांनी आठवण करून देताच, ते आता आमच्या पक्षात आले आहेत, असे आडीवरेकर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news