सावंतवाडी नगरपरिषदेत 'भाजपा विरुद्ध भाजपा' वाद चव्हाट्यावर, प्रोटोकॉलवरून नगरसेविकांमध्ये जुंपली

प्रोटोकॉलवरून नगरसेविकांमध्ये जुंपली
सावंतवाडी नगरपरिषद
सावंतवाडी नगरपरिषद
Published on
Updated on

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत मनभेद आणि मतभेद आता उघडपणे चव्हाट्यावर आले आहेत. नगरपरिषदेत 'भाजपा विरुद्ध भाजपा' असाच काहीसा प्रकार पाहायला मिळत असून, सभापती पदाच्या प्रोटोकॉलवरून (मान-सन्मान) नगरसेविकांमध्ये पत्रकारांसमोर सभागृहातच तीव्र वाद झाला.

हा वाद इतका विकोपाला गेला की, नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांना आपली नियोजित पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द करावी लागली. मात्र, नंतर सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत समेट घडवून आणल्याचे पाहायला मिळाले. सावंतवाडी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

या पत्रकार परिषदेसाठी सभागृहातच नगराध्यक्षांच्या बाजूला आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, तसेच दुसऱ्या बाजूला नगरसेविका नीलम नाईक आणि महिला व बालकल्याण उपसभापती सुनीता पेडणेकर बसल्या होत्या. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच तिथे आलेल्या नगरसेविका व सभापती मोहिनी मडगावकर यांनी थेट नगराध्यक्षांकडे संताप व्यक्त केला.

सावंतवाडी नगरपरिषद
सावंतवाडी वैश्य समाज भवन जागेबाबत 'जैसे थे'चे आदेश

"सभापती असूनही नगरपरिषदेत प्रोटोकॉल पाळला जात नाही. नगराध्यक्षांच्या बाजूला आम्हाला बसू दिले जात नाही. मागील पत्रकार परिषदेत तर मला अक्षरशः स्टेजच्या खाली बसावे लागले होते, जो माझा आणि माझ्या सभापती पदाचा अवमान आहे. आज पुन्हा तोच अवमान होत आहे," अशी जाहीर तक्रार मडगावकर यांनी केली.

सभागृहातच रंगले नाट्य; दोन नगरसेविकांमध्ये 'तू-तू मैं-मैं'

मोहिनी मडगावकर यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तिथे उपस्थित असलेल्या नगरसेविका नीलम नाईक यांनी तात्काळ उत्तर देत, "तुम्ही इथे येऊन बसा, हे असे (तक्रार करून) सांगण्याची गरज नव्हती," असे सुनावले. यावरून दोन्ही नगरसेविकांमध्ये सभागृहातच जोरदार वाद आणि 'तू-तू मैं-मैं' सुरू झाली. हा वाद वाढल्याने नाराज झालेल्या नीलम नाईक पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच तिथून निघून गेल्या; त्यांच्यासोबत उपसभापती सुनीता पेडणेकर यांनीही काढता पाय घेतला. सत्ताधारी पक्षातील या अंतर्गत वादामुळे शेवटी नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले यांच्यावर पत्रकार परिषद रद्द करण्याची नामुष्की ओढवली.

सावंतवाडी नगरपरिषद
Weather Forecast- पुढील दोन आठवड्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

सायंकाळी अखेर समेट; मडगावकरांना मिळाले स्थान

सकाळच्या सत्रातील हायड्राम्यानंतर नगरपरिषदेत वेगाने घडामोडी घडल्या. रद्द झालेली ही पत्रकार परिषद नगराध्यक्षांनी सायंकाळी पुन्हा घेतली. या सायंकाळच्या पत्रकार परिषदेत मात्र सकाळी झालेला वाद मिटल्याचे दिसून आले. यावेळी सभापती मोहिनी मडगावकर या नगराध्यक्षांच्या शेजारी सन्मानाने बसलेल्या पाहायला मिळाल्या.

सभापती पद आम्हीच दिले, प्रोटोकॉल कसला ?': दुलारी रांगणेकर

या संपूर्ण वादावर प्रतिक्रिया देताना नगरसेविका दुलारी रांगणेकर आणि सुनीता पेडणेकर यांनी मोहिनी मडगावकर यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. "सभापती हे पद आम्हा नगरसेवकांनीच दिले आहे, त्यामुळे इथे कसलाही प्रोटोकॉलचा विषय येत नाही. आम्ही नगरसेवकांनी मिळून सभापती निवडले असल्याने अशा प्रकारची तक्रार करणे अजिबात योग्य नाही. तसेच, अशा पद्धतीने इतर नगरसेवकांचा अवमान करणेही चुकीचे आहे," अशा स्पष्ट शब्दांत रांगणेकर व पेडणेकर यांनी मडगावकर यांना टोला लगावला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news