

मळगाव : सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर खड्डा पडल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनसमोरील परिसराचे सुशोभीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. रेल्वे स्टेशन आवारात प्रवासी वाहने येण्यासाठी प्रवेशद्वार बनवण्यात आले. त्या प्रवेशद्वारातून समोरील रस्त्यावरून गणेशोत्सवाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशन आवारात वाहनांची वर्दळ सुरु होती. त्यात पडणार्या पावसामुळे सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावरच खड्डा पडला आहे.
त्या खड्ड्यातून वाहने जात असल्यामुळे वाहन चालकासह प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सावंतवाडी रोड प्रवेशद्वारातून रेल्वे स्टेशन परिसरात येणार्या वाहनांना या खड्ड्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रेल्वे स्टेशन प्रवेशद्वाराजवळील खड्डा बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा, असे आवाहन प्रवाशांमधून होत आहे.