Sawantwadi Crime News| रागाच्या भरात कोयत्याने वार केल्याची कबुली !

Sawantwadi Crime News| हत्येसाठी वापरलेला कोयता पोलिसांनी केला जप्त
Sangli Crime News
‘आम्ही दादा आहोत’ म्हणत तरुणावर कोयत्याने वारFile Photo
Published on
Updated on

सावंतवाडी : ओवळीये- मधलीवाडी येथील जागेच्या तसेच मोबाईलवर शुटींग काढल्याच्या रागातून झालेल्या वादावादीतून महिलेवर कोयत्याने हल्ला करून तिची हत्या केल्या प्रकरणी संशयित रघुनाथ सावंत याने आपणच तिच्या हातातून कोयता काढून घेत तिच्या डोक्यावर हल्ला केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

Sangli Crime News
Nashik Water Cut: नाशिकमध्ये पाणीपुरवठ्याचा दोन दिवसांचा 'शटडाउन'; तारखा, वेळ काय?

रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे त्यांनी पोलिसाना तपासात सांगितले. दरम्यान पोलिसांनी मंगळवारी पुन्हा घटनास्थळी दाखल होत हल्ल्यातील कोयता जप्त केला. ओवळीये-मधलीवाडी येथे सामाईक जागेत संशयित मोबाईलवरून जागेचे शुटींग करीत असताना झालेल्या वादातून महिलेचा डोक्यावर कोयत्याने वार केल्याने मृत्यू झाला होता.

याप्रकरणी संशयित रघुनाथ सावंत, विजय सावंत याच्यावर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित दोघेही बाप, मुलगा असून ते सध्या पोलिस कोठडीत आहेत.

Sangli Crime News
Ratnagiri Water Scarcity | जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईच्या झळा तीव्र होणार

दुसऱ्या दिवशी पुन्हा संशयित यांना घटनास्थळी नेऊन पोलिसांनी तपास केला. या हल्ल्यातील कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनीही या गुन्ह्यात लक्ष घातले. दोन्ही कुटुंबीयात जमीन जागेवरून वाद होते.

त्यात रविवारी मोवाईलवरून शुटींग करत असताना वाद आणखीन विकोपाला जाऊन रागाच्या भरात आपण सरस्वती सावंत यांच्या हातातील कोयता काढून घेत त्यांच्या डोक्यावर हल्ला केल्याची कबुली तपासात रघुनाथ सावंत याने पोलिसांना दिली आहे. या गुन्ह्यात अन्य कोणतेही कारण नसून जमीन जागेच्या वादातूनच हा प्रकार घडल्याचे पोलिसांना संशयित यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news