Deepak Kesarkar | नैतिकता शिल्लक असेल, तर केसरकरांनी राजीनामा द्यावा

Deepak Kesarkar | ठाकरे सेना आक्रमक; थेट एसआयटी चौकशीची मागणी
Deepak Kesarkar
Deepak Kesarkar
Published on
Updated on

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा

भोंदूद्वाबा अशोक खरात याच्या सोबत सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचे फोटो प्रसिद्ध झाल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. मतदारसंघातील समस्या सोडविण्याऐवजी अशा भोंदू बाबांच्या नादी लागणाऱ्या आमदारामुळे सावंतवाडी मतदारसंघ व सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी झाली आहे, असा आरोप करत ठाकरे शिवसेनेच्या कार्यकत्यांनी मंगळवारी सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयावर धडक दिली.

Deepak Kesarkar
Nashik Pune Railway | नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प आता केंद्राच्या ताब्यात! राज्य सरकारने 'महारेल'कडे मागितले 684 कोटी परत

केसरकरांनी राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली. उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर, शब्बीर मणियार, सावंतवाडी तालुकाप्रमुख रमेश सावंत, राजू शेटकर तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आ. केसरकरांच्या निषेधाचे फलक घेऊन शिवसैनिक प्रांत कार्यालयावर धडकले. तसेच, त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चा बापूसाहेब महाराजांच्या पुतळ्यापासून एसटी बस स्थानकासमोरून प्रांताधिकारी कार्यालयासमोर धडकला. प्रांताधिकारी समीर घारे अनुपस्थित असल्याने तहसीलदार श्रीधर पाटील यांनी मोर्चाला सामोरे जात निवेदन स्वीकारले.

Deepak Kesarkar
Nashik Kumbh Mela 2027 Railway| कुंभमेळ्याचा मार्ग मोकळा; नारायणगावात रेल्वेसाठी भूसंपादन पूर्ण

मोर्चाची व्याप्ती आणि शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रांत कार्यालयाबाहेर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. या मोर्चामुळे शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.

खरात आणि केसरकर यांचे बॅनर झळकावले

या आंदोलनाचे नेतृत्व विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केले. ते म्हणाले, भोंदूबाबा अशोक खरात याला दीपक केसरकर यांचे राजकीय पाठबळ आहे. त्यांच्यात थोडीजरी नैतिकता शिल्लक असेल, तर केसरकरांनी तातडीने आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, आ. केसरकरांची या प्रकरणी 'एसआयटी'मार्फत चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली. आंदोलनादरम्यान दीपक केसरकर आणि अशोक खरात यांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर झळकावून घोषणाबाजी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news