

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील टोपीवाला तांत्रिक विद्यालय परिसरात भरवस्तीत नागरिकांना बिबट्या दिसून आला. याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे जलद कृती दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ही घटना गुरुवारी रात्री 9.30 च्या दरम्यान घडली.
बिबट्याचा शोध घेण्यासाठी आधुनिक नाईट व्हिजन ड्रोनद्वारे शोध सुरू आहे. शहरातील इतर भागांत जाऊन ड्रोनद्वारे शोध घेणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील, वनपाल प्रमोद राणे, जलद कृती दल प्रमुख बबन रेडकर, वनरक्षक प्रवीण कमळकर, वनरक्षक सुशांत चोथे, जलद कृती दल कर्मचारी शुभम कळसुलकर, तुषार सावंत, ड्रोन चालक जतिन पटकारे आदी उपस्थित होते.