

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसंत ऊर्फ अण्णा केसरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय सुविधांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रुग्णालय प्रशासनाकडे पत्राद्वारे तक्रार करत त्यांनी म्हटले आहे, रुग्णालयात आय.सी.यू. (खउण)आणि ट्रॉमा केअर युनिट (ढीर्रीार उरीश णपळीं)पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्यामुळे गंभीर रूग्णांना उपचारांसाठी गोव्यातील बांबुळी येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले जात आहे. गेल्या चार महिन्यांत 745 पेक्षा जास्त रुग्णांना गोव्याला रेफर करण्यात आले, असा दावा त्यांनी पत्रात केला आहे.
रुग्णालयात मंजूर 15 वैद्यकीय अधिकार्यां पैकी केवळ 6 पदे नियमित डॉक्टरांनी भरलेली आहेत. उर्वरित 9 डॉक्टर कंत्राटी पद्धतीने छकच किंवा बंधपत्रावर कार्यरत आहेत. रुग्णालयात दोन च.ड. सर्जन आणि एक ऑर्थोपेडिक डॉक्टर असूनही मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत. सिझेरियन शस्त्रक्रियांचे प्रमाणही स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या निवृत्तीनंतर घटले आहे.
कंत्राटी डॉक्टर त्यांच्या स्वतःच्या खासगी रुग्णालयांना जास्त वेळ देत असून, उपजिल्हा रुग्णालयात केवळ दोन ते तीन तास सेवा देतात, अशी तक्रार या पत्रात करण्यात आली आहे. ट्रॉमा केअर युनिट आणि खउण सुविधांच्या अभावामुळे परशुराम पोखरे या अपघातग्रस्त तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. उपचारांसाठी त्याला गोव्याला पाठवण्यात आले होते. या मृत्यूसाठी जबाबदार कोण? याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही केसरकर यांनी केली आहे.
रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्यांची पदे भरून खउण आणि ट्रॉमा केअर युनिटपूर्ण क्षमतेने त्वरित सुरू करण्याची मागणी श्री. केसरकर यांनी केली आहे. रुग्णालयातील सुविधांची ही स्थिती स्थानिक नागरिकांसाठी चिंतेची बाब असून, यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अण्णा केसरकर यांनी केलेल्या मागण्यांवर रुग्णालय प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.