

कासार्डे : कासार्डे माध्यमिक विद्यालयाची इ. 6 वीची विद्यार्थिनी सावी वैभव मुद्राळे हिची ‘प्रोजेक्ट वीर गाथा 5.0’ या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमासाठी निवड झाली आहे.
शिक्षण मंत्रालय व संरक्षण मंत्रालय यांच्या विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात संपूर्ण भारतातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून तसेच 18 देशांतील 91 शाळांचे असे एकूण 19.2 कोटी विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. त्यातून 100 विद्यार्थी निवडले. त्यात सावी मुद्राळे हिने आपल्या सृजनशील आणि सर्जनशीलतेने व उत्कृष्ट सादरीकरणाने विशेष यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल तिला रु.10 हजार रू. रोख बक्षीस,प्रशस्तीपत्र व राष्ट्रीयस्तरावर सन्मान होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते हा सत्कार दिल्ली येथे 25 जानेवारी रोजी होणार आहे व विशेष अतिथी म्हणून गणतंत्र दिवसाची परेड ही पाहायला मिळणार आहे. या यशासाठी तिला कासार्डे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री बिसुरे, ,पर्यवेक्षक एस.व्ही. राणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.