Rare Insect Species | झोळंबे गावात आढळला दुर्मीळ ‘अ‍ॅटलास मॉथ’

Rare Insect Species | झोळंबे गावात आढळला दुर्मीळ ‘अ‍ॅटलास मॉथ’

‘पतंगा’च्या सर्वात मोठ्या प्रजातींपैकी एक; दोडामार्गच्या समृद्ध जैवविविधतेत भर
Published on

दोडामार्ग : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला दोडामार्ग तालुका जैवविविधतेसाठी ओळखला जातो. ‘दुसरे अ‍ॅमेझॉन’ म्हणून या भागाची ख्याती असून, येथे अनेक दुर्मीळ आणि विलुप्तप्राय प्रजाती आढळून आल्या आहेत. झोळंबे गावात एका फार्मलगत नुकतेच दुर्मीळ आणि विस्मयचकित करणारे दृश्य पाहायला मिळाले. सर्वात मोठ्या पतंग प्रजातींपैकी एक असलेला अ‍ॅटलास मॉथ येथे आढळला. त्यामुळे निसर्गप्रेमींमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

झोळंबे परिसरात निसझोळंबे परिसरात निसर्ग अभ्यासक ओंकार गावडे, सूरज गावडे आणि विकास कुलकर्णी यांच्या निरीक्षणात हा दुर्मीळ पतंग आढळून आला. बदामी तपकिरी आणि लालसर रंगछटांचा हा पतंग 25 ते 30 सें.मी. (10-12 इंच) लांबीचा असून त्याचे पंख मोठे, पसरट आणि भडक रंगाचे असतात. विशेष म्हणजे पंखांच्या टोकाला नागाच्या डोळ्यांसारखी आकृती असते. जी त्याच्या नैसर्गिक संरक्षणासाठी उपयोगी ठरते. पंखांवर असलेल्या पांढर्‍या ठिपक्यांमुळे आणि नकाशाप्रमाणे दिसणार्‍या नक्षीमुळे त्याला ‘अ‍ॅटलास मॉथ’ असे नाव आहे.र्ग अभ्यासक ओंकार गावडे, सूरज गावडे आणि विकास कुलकर्णी यांच्या निरीक्षणात हा दुर्मीळ पतंग आढळून आला. बदामी तपकिरी आणि लालसर रंगछटांचा हा पतंग 25 ते 30 सें.मी. (10-12 इंच) लांबीचा असून त्याचे पंख मोठे, पसरट आणि भडक रंगाचे असतात. विशेष म्हणजे पंखांच्या टोकाला नागाच्या डोळ्यांसारखी आकृती असते. जी त्याच्या नैसर्गिक संरक्षणासाठी उपयोगी ठरते. पंखांवर असलेल्या पांढर्‍या ठिपक्यांमुळे आणि नकाशाप्रमाणे दिसणार्‍या नक्षीमुळे त्याला ‘अ‍ॅटलास मॉथ’ असे नाव आहे.

अ‍ॅटलास मॉथ हे निशाचर असून ते दिव्याच्या प्रकाशाकडे आकर्षित होतात. विशेष बाब म्हणजे या पतंगांना तोंड अथवा पचनसंस्था नसते. त्यांच्या अळ्या अवस्थेतच (सुरवंट) ते आवश्यक अन्नसेवन करून पुढील आयुष्यासाठी ऊर्जा साठवतात.

एक मादी पतंग एका वेळेस 100 ते 200 अंडी घालते. आंबा, पेरू, अवोकाडो, लिंबूवर्गीय झाडांवर अंडी घालण्यास तिची विशेष पसंती असते. अंडी उबवून 10-12 दिवसांत सुरवंट बाहेर पडतो, जो पुढील 30-40 दिवस झाडांची पाने खाऊन वाढतो आणि स्वतःभोवती कोष तयार करतो. कोषातून साधारणपणे 21 दिवसांत नवा पतंग बाहेर पडतो. प्रजोत्पादनानंतर या पतंगांचे आयुष्य अवघे 5-7 दिवसांचेच असते.

Rare Insect Species | झोळंबे गावात आढळला दुर्मीळ ‘अ‍ॅटलास मॉथ’
Malvan Theft Arrest | घरफोडीच्या गुन्ह्यात तीन वर्षे फरार संशयित पंढरपुरात जेरबंद

प्रदेश जैवविविधतेच्या नकाशावर ठळकपणे उठून दिसेल

झोळंबे व परिसरातील घनदाट सदाहरित जंगलांमध्ये शेकडो फुलपाखरे आणि पतंग प्रजाती आढळतात. हनुमंतगड, घारपी या पठारी प्रदेशांमुळे येथे विविध भौगोलिक रचना निर्माण झाल्या असून या जैवविविधतेला समृद्ध अधिवास लाभलेला आहे. निसर्गप्रेमी विकास कुलकर्णी म्हणतात, अनेक प्रजाती आजही अज्ञात आहेत. संशोधनाची गती वाढवली, तर हा प्रदेश जैवविविधतेच्या नकाशावर ठळकपणे उठून दिसेल.

नैसर्गिक अधिवास जपणे आवश्यक

अ‍ॅटलास मॉथसारखी दुर्मीळ प्रजाती सामान्यतः सहज नजरेस पडत नाहीत. त्यामुळे त्यांना शिकार समजून इजा पोहोचवू नये, असा सल्ला पर्यावरण तज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांनी दिला आहे. हा प्रदेश वेस्टर्न घाट कॉरिडॉरचा भाग असून येथे खवले मांजर, साळिंदर, पट्टेरी वाघ, बिबट्या अशा अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे या भागाला नैसर्गिक अधिवास म्हणून जपणे आवश्यक आहे. नैसर्गिक अधिवास जपणे आवश्यक

अ‍ॅटलास मॉथसारखी दुर्मीळ प्रजाती सामान्यतः सहज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news