Railway Police Return Bag | तीन लाखांचे दागिने, रोकड असलेली बॅग प्रवाशाला परत

रेल्वे सुरक्षा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
Railway Police Return Bag
कणकवली : कणकवली येथे रेल्वे सुरक्षा बलाने बॅग विजय नेवरेकर यांना सुपूर्द केली.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

कणकवली : कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये विसरलेली प्रवाशाची बॅग रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक उपनिरीक्षक दुर्गेश यादव, हवालदार युवराज पाटील, कॉन्स्टेबल प्रदीप कुमार यांनी शोधून काढली. तसेच प्रवाशाकडे सुपूर्द केली. विशेष म्हणजे बॅगेमध्ये तब्बल 3 तोळ्यांचे, 2 लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच 7 हजारांची रोकड होती. बॅग मिळवून दिल्याबद्दल प्रवासी विजय नेवरेकर (रा. मुंबई) यांनीही रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍यांचे आभार मानले. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.

विजय नेवरेकर हे मडगावच्या दिशेने जात असलेल्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या मागील जनरल बोगीतून एकटेच प्रवास करत होते. विजय हे विलवडे रेल्वे स्थानकात उतरले. मात्र, आपली बॅग गाडीमध्येच राहिल्याचे लक्षात आल्यानंतर नेवरेकर यांनी ही बाब विलवडे रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरना सांगितली.

Railway Police Return Bag
Kankavali Gramsevak Incident | ग्रामसेवकावर ब्लेडने हल्ला : 5 जणांवर गुन्हा

विलवडे रेल्वे स्थानक येथून कणकवली रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरना कळविण्यात आले. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक उपनिरीक्षक दुर्गेश यादव, हवालदार युवराज पाटील, कॉन्स्टेबल प्रदीप कुमार हे कणकवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर दाखल झाले. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दाखल झालेल्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या मागील जनरल बोगीची आरपीएफच्या कर्मचार्‍यांनी तपासणी केली असता नेवरेकर यांनी वर्णन केलेली बॅग आढळून आली.

Railway Police Return Bag
Kankavali Gramsevak Incident | ग्रामसेवकावर ब्लेडने हल्ला : 5 जणांवर गुन्हा

युवराज पाटील यांनी कणकवली येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात ती बॅग आणली. तसेच नेवरेकर यांना सुपूर्द केली. त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news