Sindhudurg Pinguli Drug Case:पिंगुळीत गांजा ओढणाऱ्या चौघांना रंगेहाथ पकडले

Sindhudurg Pinguli Drug Case:कुडाळ पोलिसांची कारवाई; गुन्ह्यात एक अल्पवयीन
Sindhudurg News
गांजाPudhari file photo
Published on
Updated on

कुडाळ : पिंगुळी-भूपकरवाडीमध्ये गोंदयाळे रोड परिसरातील एका मोकळ्या जागेत चिलीमद्वारे गांजा सेवन करणाऱ्या चार तरुणांवर कारवाई करत पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी रात्री ११.१५ वा. केली. यातील एक युवक अल्पवयीन असून, पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. याची फिर्याद हवालदार मेघश्याम भगत यांनी कुडाळ पोलिसांत दिली. यानुसार हवालदार प्रमोद काळसेकर यांच्यामार्फत पोलिसांनी भूपकरवाडी येथे धाड टाकली. घटनास्थळी पोलिसांना चार तरुण आळीपाळीने चिलीम ओढत असल्याचे निदर्शनास आले.

Sindhudurg News
Sindhudurg | निवजेतील चक्रीवादळापूर्वी 'फलेन ढग'

पोलिसांनी छापा टाकून या चौघांनाही ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी चिलीममधून गांजा सेवन केल्याची कबुली दिली. सौरभ उमेश पिळणकर (१८, कोणार्क प्लाझा, कुडाळ बाजारपेठ), विजय दिवाकर मांजरेकर (१८, स्वामी समर्थनगर, हुमरमळा), श्वान रॉकी डिसोजा (१८, भूपकरवाडी, पिंगुळी), व एक 17 वर्षीय अल्पवयीन तरुण, अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांना ताब्यात घेऊन कुडाळ पोलिस ठाण्यात आणण्यात आले व त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

Sindhudurg News
Sindhudurg Unseasonal Rain| सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यांना वादळी पावसाचा तडाखा; लाखो रुपयांची हानी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news