Express Train Halt Demand
कुडाळ : पाहणी दरम्यान अधिकार्‍यांशी चर्चा करताना समिती पदाधिकारी. (Pudhari File Photo)

Express Train Halt Demand | एक्स्प्रेस गाड्यांना कुडाळ स्थानकात थांबे द्या

प्रवासी समन्वय समितीची रेल्वे अधिकार्‍यांकडे मागणी
Published on

कुडाळ : कोकण रेल्वेच्या स्थानिक अधिकार्‍यांच्या पथकाने 1 ऑगस्ट रोजी होणार्‍या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी कुडाळ रेल्वे स्थानकाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती पदाधिकार्‍यांनी व स्थानिकांनी कुडाळ रेल्वे स्थानकावरील समस्यांचा पाढाच वाचला. लांब पल्ल्याच्या रेल्वेसह बांद्रा- मडगाव एक्स्प्रेसला कुडाळ स्थानकावर थांबा द्या. पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्लॅटफॉर्मला कव्हर शेड घाला, स्थानकावरून वायफाय सेवा व लाईट सुरू ठेवा, आदी मागण्या करण्यात आल्या. या सर्व मागण्यांचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून दिला जाईल अशी ग्वाही उपस्थित पथकाने देवून पथक मार्गस्थ झाले.

या पथकात कोकण रेल्वेचे कमर्शियल सुपरवायझर मधुकर मातोंडकर, सेक्शन इंजिनियर जी. पी. प्रकाश, एरिया सुपरवायझर विजय सामंत, इलेक्ट्रिकल इंजिनियर चिन्मय भंडारे यांचा समावेश होता. कुडाळ स्थानकाला भेट देऊन त्यांनी समस्या जाणून घेतल्या. कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रकाश पावसकर, सचिव अजय मयेकर, समन्वयक नंदश वेंगुर्लेकर, सुनिल भोगटे, साईनाथ आंबेडकर, स्वप्निल गावडे, वैभव घोगळे, नगरसेविका आफरीन करोल, रिक्षाचालक व प्रवासी उपस्थित होते.

Express Train Halt Demand
Kudal Taluka Gram Panchayat Reservation | कुडाळ तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

कुडाळ रेल्वे स्थानकावर वेंगुर्ले व मालवणसह कुडाळ तालुक्यातील प्रवासी मोठ्या प्रमाणावर उतरतात., कुडाळ हे जिल्ह्याचे मध्यवर्ती स्थानक आहे. याकडे नंदन वेगुर्लेकर यांनी प्राधान्याने लक्ष वेधत कुडाळ स्थानावर प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा द्या, वेटिंग रूम, संडास व मुतारीची चांगली व्यवस्था करा, वायफाय सेवा उपलब्ध करा, रात्रीच्या वेळी लाईट सुरू ठेवा, लिफ्टची व्यवस्था करा याकडे लक्ष वेधले. रेल्वे प्रवासी हे तिकीट काढून येतात. त्यामुळे त्यांना अत्यावश्यक सेवा देणे क्रमप्राप्त असल्याचे श्री.वेगुर्लेकर यांनी सांगितले.

कुडाळ हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्‍या अमृतसर, पोरबंदर, योगनगरी, केरळ संपर्क क्रांती आदी गाड्यांना रत्नागिरी ते मडगाव पर्यंत कुठेही थांबा नाही, त्यामुळे त्या गाड्यांना कुडाळ येथे थांबा द्या. मेंगलोर एक्सप्रेस व बांद्रा- मडगाव एक्सप्रेसला कुडाळमध्ये थांबा द्या अशी विनंती केली.

रेल्वे स्थानकाबाहेर पार्किंगच्या जागेमध्ये रिक्षा व्यवस्थित पार्क न केल्यामुळे खासगी वाहनांना ये-जा करताना कसरत करावी लागते. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील पार्किंग जागेत रिक्षांचे पार्किंग नियोजनबद्ध करण्यात यावे. कुडाळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नं.1 च्या बाजूला दरड सदृश्य भाग असून पावसाळी मोसमात तो प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. याठिकाणी संरक्षक भिंत बांधली जाईल असे जी. पी. प्रकाश यांनी सांगितले. स्थानकावरील शेड नादुरुस्त असून त्याच्या दुरुस्तीसाठी उपस्थित अधिकार्‍यांचे समिती पदाधिकार्‍यांनी लक्ष वेधले.

Express Train Halt Demand
Kudal Shortcircuit Issue | वेताळबांबर्डे शॉकसर्किटमुळे घराला आग!

ही सर्व कामे प्राधान्याने केली जातील, अशी ग्वाही उपस्थित अधिकार्‍यांनी दिली. रेल्वेस्टेशन वरून रेल्वे निवासस्थान बाजूकडे रेल्वे ट्रॅक खालून जाणार्‍या रस्त्याची उपस्थित अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असून त्या रस्त्याची सद्यस्थितीत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे त्या रस्त्याची प्राधान्याने दुरुस्ती करा, अशी मागणी करण्यात आली. रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर कचरा टाकला जातो, याकडे नगरसेविका आफरीन करोल यांनी अधिकार्‍यांचे लक्ष वेधले.

एजंटांना तिकिटे कशी उपलब्ध होतात ?

कोकण रेल्वेच्या कोणत्याही दिवसाचे तिकीट प्रवाशांना सहज उपलब्ध होत नाही; मात्र तेच तिकीट एजंटांना कसे उपलब्ध होते? याकडे उपस्थित अधिकार्‍यांचे समिती पदाधिकार्‍यांनी व नागरिकांनी लक्ष वेधत तीव्र नाराजी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news