

सावंतवाडी : नागपंचमी दिवशी मंगळवारी चक्क नागाने दर्शन दिल्याची घटना कोलगाव येथे घडली. रघुनाथ कोरगावकर यांच्या घरी हे नागराज प्रकटले त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला नमस्कार करत त्याची पूजा केली.
नागपंचमीच्या दिवशी घरात त्याचे आगमन होणे शुभ मानले जाते. पुराणात या सणाला अध्यात्मिक महत्व आहे. परंतु क्वचितच असे घडत असते.
सावंतवाडी कोलगाव येथील रघुनाथ कोरगावकर यांच्या घराच्या दारातच मंगळवारी दुपारी चक्क नागराज अवतरले आणि कुटुंबाला सुखद धक्काच दिला.