Municipal Election Results | नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक निकालाची घडी समीप

जनतेचा कौल कुणाला? उमेदवारांसह जिल्हावासीयांची उत्कंठा टिपेला
Municipal election results
Municipal Election Results | नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक निकालाची घडी समीप Pudhari Photo
Published on
Updated on

कणकवली : सिंधुदुर्गातील सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण या नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत निवडणूक निकालाची घडी आता समीप आली आहे. रविवार, दि. 21 डिसेंबर रोजी त्या-त्या तहसील कार्यालयांत मतमोजणी होणार असून, निकालाला आता केवळ 48 तास उरले आहेत. राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या निवडणुकीत जनतेचा कौल कुणाच्या बाजूने असणार आहे? कोण नगराध्यक्ष होणार आणि कोण कोण नगरसेवक म्हणून निवडून येणार? या सार्‍याचा फैसला रविवारी होणार आहे. त्यामुळे रिंगणातील सर्वच उमेदवारांसह सिंधुदुर्गवासीयांची उत्कंठा टिपेला पोहोचली आहे.

सिंधुदुर्गातील मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत अशा चार पालिकांसाठी 74.35 टक्के मतदान झाले होते. या निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी 18 उमेदवार आणि 77 नगरसेवक पदासाठी 270 उमेदवारांची भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले होते. मात्र 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी 21 डिसेंबर पर्यंत पुढे

गेल्याने सर्वांचीच उत्कंठा ताणली गेली होती. नगरपालिकांच्या निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप गाजला होता तर सावंतवाडीत मतदान संपण्यास काही कालावधी शिल्लक असताना शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये धक्काबुक्की होवून राडा झाला होता. या निवडणूकीत पालकमंत्री नितेश राणे, आ. नीलेश राणे, आ. दीपक केसरकर यांच्यासह सावंतवाडी राजघराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष रविवारी होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे.

कणकवली नगराध्यक्ष पदासाठी 3 तर 17 नगरसेवक पदांसाठी 36 असे 39 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे कणकवलीकर कुणाच्या बाजूने कौल देतात याची उत्कंठा सर्वांनाच आहे. कणकवली न.पं. निवडणूकीत भाजप विरोधात दोन्ही शिवसेना व काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी यांची शहरविकास आघाडी अशी थेट दुरंगी लढत झाली आहे.

दोन्ही बाजूने जोरदारपणे प्रचार यंत्रणा राबविण्यात आली होती. त्यामुळे या निवडणूकीच्या निकालाकडे कणकवलीसह जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. मालवणमध्ये भाजप, शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना यांच्यात तिरंगी तर वेंगुर्ले आणि सावंतवाडीत भाजप, शिंदे शिवसेना, काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना अशी चौरंगी लढत झाली होती. त्यामुळे या नगरपालिकांवर कुणाचा झेंडा फडकतो याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

उमेदवारांची धाकधूक वाढली; निकालाबाबत तर्कवितर्क सुरू

मतदानानंतर मतमोजणी पुढे गेल्याने सर्वच पक्षांचे उमेदवार गेले 15 दिवस काहीसे रिलॅक्स होते. मात्र, आता जसजशी मतमोजणीची तारीख जवळ येत आहे तसतशी उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. राजकीय पक्षांकडून आणि जनतेकडूनही निकालाबाबत तर्कविर्तक लढविले जात आहेत. काही ठिकाणी पैजाही लावल्या गेल्याचे समजते. या सार्‍याचा फैसला रविवार 21 डिसेंबर रोजी दुपारी 12 वा. पर्यंत होणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. निवडणूक विभाग व जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची सर्वतोपरी तयारी केली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे.

Municipal election results
Sindhudurg Bank Loan Distribution |सिंधुदुर्ग बँकेचे कर्ज वाटप नाबार्ड व सहकार खात्याच्या धोरणानुसारच!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news