Vengurla News | मठ शाळा शून्य शिक्षकी जाहीर: ग्रामस्थांच्या वतीने शाळा बंद आंदोलन

शून्य शिक्षकी जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन करण्याचे आदेश
Vengurla school shutdown protest
Vengurla school shutdown protest Pudhari
Published on
Updated on

Vengurla school shutdown protest

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील रायसाहेब डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूल मठ ही शाळा शासन निर्णयानुसार शून्य शिक्षकी जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात मंगळवारी (दि.९) कृती समिती, ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमी, स्थानिक लोकप्रतिनिधी व माजी विद्यार्थी यांच्यावतीने हायस्कूल समोर " हायस्कुल बचाव - शाळा बंद आंदोलन सुरु आहे. यास पालक ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला .

शासनाने जाहीर केलेल्या धोरणामुळे शाळा वाचविण्यासाठी डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कुल मठ कृती समिती, पालक, ग्रामस्थ यांच्या वतीने हे हायस्कुल बचाव आंदोलन सुरु आहे.

Vengurla school shutdown protest
Matka Gambling Raids | वेंगुर्ला पोलिस व एलसीबीची तीन ठिकाणी मटका व्यवसायावर धडक कारवाई

यावेळी मठच्या सरपंच रुपाली नाईक, कृती समिती सल्लागार रवींद्र खानोलकर, कृती समिती अध्यक्ष दिगंबर परब, उपाध्यक्ष केशव ठाकूर, सचिव संतोष तेंडोलकर, नूतन हितवर्धक मंडळ मुंबई चे सदस्य प्रकाश मठकर, भाजपचे तालुका पदाधिकारी रवींद्र सिरसाट, कमिटी सदस्य तुषार आईर, न्हानू गावडे, शैलेश राणे, कृष्णा मठकर, प्रीती परब, मयुरी ठाकूर, सुनिखी धुरी, ग्रा. पं. सदस्य शमिका मठकर, संतोष वायंगणकर, महेश सावंत, कृष्णा मठकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलम गावडे, उपाध्यक्ष संजना तेंडोलकर, मठ पोलीसपाटील अदिती परुळेकर, सतये पोलीस पाटील शमिका धुरी, माजी सरपंच किशोर पोतदार, पत्रकार व माजी विद्यार्थी अजय गडेकर, सौरभ परब, दत्ताराम कोकरे, माजी शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सतीश गावडे, देवेंद्र गावडे, आनंद होडावडेकर, भरत परब, शिवराम आरोलकर, सूर्यकांत परब, विजय गावडे, सुहास धुरी, सुरेश धुरी, केशव ठाकूर, संजय गावडे, सुनिल बोवलेकर, दिवाकर परुळेकर, दत्तप्रसाद कावले, ओंकार मराठे,, सुजय परुळेकर, मिलिंद खानोलकर, प्रसाद परुळेकर, उमेश गावडे, गनपत परब, आशुतोष परुळेकर, सुभाष मठकर, अवि खानोलकर, विद्याधर कडुलकर, आबा मठकर आदी शिक्षणप्रेमी, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासनाच्या वतीने शून्य शिक्षकी शाळा व शिक्षक समायोजन धोरण निर्गमित करण्यात आले आहे.याबाबत काल जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मठ शिष्टमंडळाने जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबूडकर यांची भेट घेण्यात आली व सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. यावेळी मनिष दळवी यांनी याबाबत वरिष्ठ स्तरावर हा विषय घेण्यात येऊन शाळेला न्याय दिला जाईल, असे स्पष्ट केले.

दरम्यान सल्लागार रवींद्र खानोलकर यांनी मठ गावाचा डोंगरी निकषामध्ये समावेश झाला असून महाराष्ट्र शासनाने त्वरित असे अन्यायकारक निकष न लावता त्वरित शाळेच्या हिताच्या दृष्टीने त्वरित अंमलबजावणी करावी, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news