

Maritime Security Mission
वेंगुर्ले : पुढारी वृत्तसेवा
शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या सागरी सुरक्षा कवच अभियानाअंतर्गत वेंगुर्ले पोलीस स्थानकाच्यावतीने या अभियानाचा वेंगुर्ले बंदर येथून शुभारंभ करण्यात आला.
वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले तालुक्यातील सर्वच सागरीकिनारी भेट देऊन पाहणी करण्यात आली. तसेच सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानवेळी पोलीस निरीक्षक संदीप भोसले, एपीआय सागर खंडागळे, विद्या जाधव, पीएसआय शेखर दाभोलकर आदींच्या पथकाने भेट दिली. सागरी सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी संबंधित ठिकाणचे सागरीरक्षक, वॉर्डन उपस्थित होते. त्यांना सागरी सुरक्षा संदर्भात सूचना देण्यात आल्या.